पळशी येथील सराफ व्यावसायिकाला लुटले बारा तोळे सोने लंपास


पळशी येथील सराफ व्यावसायिकाला लुटले बारा तोळे सोने लंपास

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

पळशी (ता.बारामती) येथील अमर ज्वेलर्स या सराफ व्यावसायिकाला पळशी मोरगाव भर रस्त्याला सोमवारी सायंकाळी चेहऱ्यावर कपडा टाकत लुटले. सोने, चांदी व्यावसायीकाच्या बँगमधील बारा तोळे सोने पल्सर मोटारसायकल वरून लंपास केले आहे. तिघा चोरट्यांनी मोटर सायकल वरुन पलायन करताना मुर्टी येथे रस्ता रोखणाऱ्या युवकांना बंदूकीचा धाक दाखवत चौधरवाडीच्या वनविभागाच्या क्षेत्रात पलायन केल्याचे स्थानिकांनी सांगितले.

   वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या

माहितीनुसार पळशी (ता.बारामती) येथे नव्यानेच दसऱ्या दिवशी सुरु केलेल्या सोने चांदीच्या दागिन्यांचे सराफ व्यावसायिक संध्याकाळी दुकान बंद करून पळशी येथून मोरगावकडे दुचाकीवरून निघाले होते. ओसाड माळरानावर आधीच दबा धरुन बसलेल्या तिघांनी अचानक व्यावसायीकाच्या अंगावर कापड टाकले, त्या कापडात मिरचीची पुडही होती. त्यामुळे व्यावसायिकाच्या डोळात जळजळ झाल्याने ते गडबडले व तिघा चोरट्यांनी व्यावसायीका जवळची बँग पळवली. तिघे चोरटे लाल- काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून नीरेच्या दिशेने जात असताना, मुर्टीतील काही युवकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत पलायन केले. मुर्टीतील युवकांनी वडगाव निंबाळकर पोलिसांना या घटनेची कल्पना देताच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी तात्काळ जेजुरी, नीरा, मोरगाव पोलीसांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News