महिला बचत गटांचे लॉकडाऊन काळातील कर्ज माफ करा : महिला बचत गटांचा श्रीगोंदा तहसील कार्यालयात धरणे आंदोलन.


महिला बचत गटांचे लॉकडाऊन काळातील कर्ज माफ करा : महिला बचत गटांचा श्रीगोंदा तहसील कार्यालयात धरणे आंदोलन.

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.२६:  महिला बचत गटांचे लॉक डाऊन काळातील कर्ज माफ माप करावे या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी व तालुक्यातील महिला बचत गटांच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विविध जाती-समाजाच्या गोरगरीब महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

      सरकारने शेतकऱ्यांचे, उद्योगपतींचे कर्ज माफ केले त्याच पद्धतीने समाजातील उपेक्षित महिलांनी केलेल्या बचत गटांचे कर्ज माफ करावे. बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्या कर्ज पुरवठा करतात. या फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी हप्ते वसुलीसाठी तगादा लावत आहेत प्रसंगी शिवीगाळ व विनयभंगासारख्या घटना घडत आहेत.लॉक डाऊन काळात रोजगार बुडाला व नंतर नैसर्गिक आपत्ती आल्याने व्यवसाय व रोजगारावर परिणाम झाल्याने कर्जदार महिला हप्ते फेडू शकत नाहीत. व या कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी केली जात आहे. या प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील महिला बचत गटांच्या मार्फत धरणे आंदोलन केले.

       यावेळी बचत गटातील पीडित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या धरणे आंदोलनात महिलांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या.जर कर्ज माफ झाले नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही.अशी अगतिकता महिलांनी व्यक्त केले याप्रसंगी अहमदनगर जिल्हा बहुजन मुक्ती पार्टीचे संयोजक संजय सावंत,दौंड तालुकाध्यक्ष अशोक होले, हवेली तालुका अध्यक्ष विशाल पेठकर,अमोल लोंढे व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक श्रीकांत होवाळ यांनी सरकारला इशारा देऊन सांगितले की जर या महिलांचे तातडीने कर्ज माफ झाले नाही तर राज्यस्तरावरील आंदोलनाची आम्ही घोषणा करत आहोत.होणाऱ्या परिणामांची जबाबदारी राज्य शासन व केंद्र शासनावर राहील. धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन संजय सावंत तर आभार प्रदर्शन ऍड राहुल शिंदे यांनी केले.

         यावेळी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देऊन महिलांनी आपल्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. या आंदोलनाला मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News