मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून बढतीमध्ये तात्काळ आरक्षण द्या,विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्ती द्या गौतम कांबळे


मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून बढतीमध्ये तात्काळ आरक्षण द्या,विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्ती द्या गौतम कांबळे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड येथे पत्रकार परिषदेत बोलताना श्री गौतम कांबळे यांनी वरील विषया संदर्भात चर्चा करून सदर मागण्या केल्या आहेत, पुढे त्यांनी दीक्षाभूमी नागपूर ते वर्षा बंगला मुख्यमंत्री निवास मुंबई पर्यंत निघणाऱ्या आरक्षण बचाव मार्चबद्दल माहिती दिली .

या आरक्षण बचाव मार्चचा कालावधी दिनांक 30 /10 / 2020 ते दिनांक 03 /11/ 2020 हा आहे .सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या नोकरीमधील बढती प्रकरणाच्या सुरु असलेल्या केसमध्ये तज्ञ वकीलाची नेमणुक राज्य सरकारने तात्काळ करण्यात यावी. पदोन्नतीमध्ये एसी ,एसटी , व्हीजेएनटी , एसबीसी प्रमाणे ओबीसींनाही बढतीमध्ये आरक्षण तात्काळ लागू करावे. मागासवर्गीयांच्या रिक्त जागा त्वरित भरावीत .सर्वसाधारण पदाप्रमाणे मागासवर्गीयांची पदे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीनराहून बढतीने (प्रमोशनने )तात्काळ भरावी . यावेळी श्री . दादा डाळींबे जिल्हाध्यक्ष व श्री . हौशीराम गायकवाड तालुका महासचिव इ . पदाधिकारी उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News