दोन तीन आठवड्यात खोका शाॅपचा प्रश्न मार्गीलावा अन्यथा जनअंदोलन करु !! विवेकभैय्या कोल्हे


दोन तीन आठवड्यात खोका शाॅपचा प्रश्न मार्गीलावा अन्यथा जनअंदोलन करु !! विवेकभैय्या कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगांव शहराचा विकास करण्यात नगराध्यक्ष अपयशी !!  - विवेक कोल्हे 

 कोपरगाव शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेत दोन महिन्यातुन एकदा सर्वसाधारण सभा होणे हे नगराध्यक्षांची जवाबदारी असतांना देखील त्यांनी केले नाही. 2016 मध्ये पालिकेची निवडणुक झाली पालिकेत 15 एप्रिल 2017 व 15 सप्टेंबर 2020 रोजी शेवटची सभा झाली आज अखेर एकुण 13 सर्वसाधारण सभा झाल्या आहेत कायद्यानुसार निवडणुक झाल्यापासुन आज अखेर 27 सभा होणे गरजेचे असतांना त्यांनी ते केले नाही पालिकेची निवडणुक होवुन चार वर्ष झाले त्यांनी केलेल्या कामाची पावती नगराध्यक्षांना 2019 च्या निवडणुकीत कोपरगांवकरांनी दाखवुन दिले. 17 ते 18 हजार मते मिळवले नगराध्यक्ष तीन वर्षात तेराशे मतावर आले. नौतिकतेची जवाबदारी म्हणुन त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

नुकतेच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेवक स्वप्नील निखाडे यांची बिनविरोध निवड झाली उपनगराध्यक्षपदाचा पदभार प्रसंगी विवेक कोल्हे बोलत होते. पराग संधान अमृत संजीवनी,आप्पासाहेब दवंगे संचालक,शरदनाना थोरात जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष, आर डी सोनवणे माजी नगराध्यक्ष, दिलीप दारुणकर माजी नगराध्यक्ष,विनोद राक्षे उत्तर जिल्हाध्यक्ष नगर अनुसुचित जाती मोर्चा,डी आर काले शहराध्यक्ष,अरुणदादा येवले , साहेबराव रोहोम तालुकाध्यक्ष, योगेश बागुल माजी उपनगराध्यक्ष विजयराव वाजे माजी उपनगराध्यक्ष ,कैलास खैरे माजी शहराध्यक्ष,बाळासाहेब नरोडे, ज्ञानेश्वर परजने,बबलू वाणी,अशोक लकारे,सत्यजित मुंदडा ,शिवाजी खांडेकर,दिनेश कांबळे वैभव गिरमे,दीपक जपे,अकबरलाला शेख,निसर भाई शेख ,शरद त्रिभुवन,रोहित वाघ अशोक टुपके,विष्णुपंत गायकवाड ,सोमनाथ मस्के , सोमनाथ अहिरे,मुन्ना दरपेल, नरेंद्रल लकारे ,सागर कोपरे, प्राध्यापक लासंकर सर , मुकुंदमामा काळे ,रवींद्र रोहमारे , सिद्धार्थ साठे,रामदास गायकवाड सर,रोहित कनगरे,वासुदेव शिंदे सिद्धार्थ पाटणकर सागर राऊत ,बाळासाहेब दीक्षित, निलेश बोराडे ,महेंद्र नाईकवाडे, खालिद कुरेशी,पिंकी चोपडा, अर्जुन मोरे,शंकर बिराडे , सचिन जाधव,शिवाजीराव निखाडे सर , शुभम काळे,माउली गोसावी विविध संस्थेचे संचालक,आजी माजी नगरसेवक, युवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी विवेक कोल्हे बोलतांना म्हणाले की, विकास काम करायचे असेल तर केंद्रात, राज्यात, तालुक्यात आपली सत्ता होती म्हणुन पालिकेत देखील आपण एकमताने काम केले पाहिजे म्हणुन आम्ही आमची तयारी दाखविली. जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले विषय सभेत घेण्यासाठी वारंवार मागणी करुन देखीन नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या मागणीला केराची टेापली दाखविली जे विषय घेणे गरजेचे असतंाना देखील ते मिटींग अजेंडावर नगरध्यक्षांनी न घेता मलीदा कशामाध्यमातुन मिळेल अशा विषयास प्रथम प्राधन्य दिले आहे.  

नगराध्यक्ष म्हणुन निवडुन आले म्हणुन त्यांनी तालुक्यातसह, जिल्हयात जिल्हाबाहेर सत्कार स्विकारला पण आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कारास निमंत्रण दिले परंतु त्यांनी ते नाकारुन व्यक्तीपेक्षा अहंकार मोठा होतो हे त्यांनी सत्कारास नकार देवुन नगराध्यक्षांनी दाखवुन दिले. त्याचबरोबर नियमानुसार नगरपालिकेत आज अखेर 27 पैकी 13 सभा झाल्या. सर्व साधारण सभा ठरवण्याचा अधिकारी कायद्यानुसार नगरध्यक्षास आहे. वरील झालेल्या सभांचा विचार करता नगराध्यक्षास कोपरगांव शहरातील नागरीकांच्या समस्यांचा अडी अडीचणी सोडविण्यासाठी किती तत्पर्ता आहे हे स्पष्ट होते. यु.आय.डी.एस.एस.एम.टी या योजने अंतर्गत कोपरगांव शहराकरीता 49.5 कोटी रुपयांची योजना केंद्र व राज्य शासनाने मंजुर केलेली असताना सदरची योजना आज अखेर पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात कार्यान्वीत नाही. आज अखेर सदर योजना कार्यान्वीत का झाली नाही ? याचा खुलासा नगरपालिकेने जनतेस करावा असे आवाहन कोल्हे यांनी करुन ते पुढे म्हणाले की,  

शहराच्या विकास आराखडयात सर्वे नंबर 210 आरक्षण क्रमांक 79 मध्ये पोलीस स्टेशन व पोलीस ग्राउंड ची जागा आरक्षीत आहे तसेच आरक्षण क्रमांक 80 हे खेळाच्या मैदानासाठी आरक्षीत आहे.मा.उच्चन्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे पिटीशन नंबर 9833/2017 अन्वये याचिका दाखल होती त्यामध्ये मुळ मालकाच्या बाजुने निकाल झालेला आहे. सदरची जागा नगरपालिकेस खेळाच्या मैदानासाठी आवश्यक आहे. अशी भक्कम बाजु न्यायालयात का नाही मांडली तसेच सदरची जागा खरेदी करण्यासाठी शासन स्तरावर कुठलाही पाठपुरावा केला नाही. मात्र प्रत्येक सर्वसाधारण सभेस सदरच्या आरक्षण उठवण्याबाबत विषय घेतला जातो मात्र मा. उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे बाबत विचारविनीमय होत नाही म्हणजे याचा अर्थ काय ? त्याचे उत्तर नगरपालिकेने द्यावे असा सवाल देखील विवेक कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला.  

यु.आय.डी. एस.एस. एम टी ४९ कोटी ५० लाखाची पाणीपुरवठा योजना ताताडीने सुरु करा , विस्थापित टपरीधारक खोका शाॕप त्वारीत उभारणे , धर्मवीर संभाजी महाराज सर्कल जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे , डाॕ.बाबासाहेब आंबेडकर  पुतळ्याजवळील सार्वजनिक मैदान काॕक्रीटीकरण करणे, लोकशाहीर आण्णाभाऊसाठे पुर्णाकृती पुतळा तातडीने उभारणे करणेबाबत, उद्योगधंद्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी खोकाशाॅपचे काम सुरु करण्यात यावे, कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यावरील गतीरोधक मानांकाप्रमाणे न झाले बाबत, कोपरगाव शहरात औषध फवारणी यासह आदि विषयाबाबतचे निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्यधिकारी यांना देण्यात आले.

 - 2004 ते 2014 या दहा वर्षाच्या कालावधीत अकार्यक्षम आमदारांनी शहरासाठी एकरुपयांचा निधी मिळवला नाही.कोपरगावात सुसज्ज शासकीय इमारत, बसस्थानक,नगरपरिषद, बाजार ओटे,नाटयगृहासाठी मंजुर झालेले  विनवियोग न झाल्याने दोन कोटी रुपये परत जातील तसेच कोपरगांव शहरात उद्योगधंद्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी खोकाशाॅपचे काम सुरु करण्यात यावे जेणे करुन विस्थापीत झालेल्या नागरिकांचा रोजी रोटीचा प्रश्न मिटेल - विवेक कोल्हे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News