शिर्डी येथे साई सदन वृद्धाश्रमाचा शुभारंभ !


शिर्डी येथे साई सदन वृद्धाश्रमाचा शुभारंभ !

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी, निराधार वृद्ध महिला-पुरुष व माता पित्यांची गरज लक्षात घेऊन सोशल मिशन संस्थेच्या वतीने साईसदन वृद्धाश्रम या सेवाभावी उपक्रमाचा शिर्डी येथे नुकताच शुभारंभ करण्यात आला. सामाजिक बांधिलकी मानणारे सेवाभावी पत्रकार तथा दै. लोकमत चे कोपरगाव विभागीय उपसंपादक मा. रोहितजी टेके साहेब यांचे शुभहस्ते फीत कापून सदर वृद्धाश्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच धामोरी गावचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण संपतराव भाकरे यांचे शुभहस्ते साई प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

       या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रोहित टेके म्हणाले की, सोशल मिशन संस्थेने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून साईबाबांच्या नावाने शिर्डी येथे सुरू करण्यात आलेल्या वृद्धाश्रमाचे उदघाटन करताना मला विशेष अत्यानंद होत आहे .परंतु वृद्धाश्रमाची संकल्पना अस्तित्वात येण्याची कारणे समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याच आईवडीलांबाबत संवेदनशील नसलेल्या समाजातील काही दूषप्रवृत्तीमुळे वृद्ध माता पित्याना जगण्याची कसरत करावी लागते .आणि अशी कसरत करताना अशा निराधार वृद्धाना आश्रयासाठी वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते.ही अतिशय दुर्दैवी अशी बाब असल्याची खंतही त्यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केली .

       सोशल मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव आहिरे आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की,साईसदन वृद्धाश्रम हा वृद्धाश्रम नसून एक परिवार आहे .येथे येणाऱ्या प्रत्येक माता पित्याचा मुलगा बनून कर्तव्य बजावण्याचा  माझा संकल्प आहे .व आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा संकल्प मी सिद्धीस नेईल असा   ठाम विश्वास विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले .जेष्ठ विचारवंत अरुण पवार सर,दै. गावकरी चे येवला ता. प्रतिनिधी विलासराव पगारे ,धामोरीचे सरपंच नारायणराव भाकरे यांनीही यथोचित भाषणे करून संस्थेच्या कार्याचा गौरव केला. सुत्रसंचालन शिवशंकर विद्यालयाचे शिक्षक चंद्रकांत धुळे सर यांनी पार पाडले 

  या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सर्वश्री एन आय ए चे पत्रकार पंढरीनाथ पगार ,आरपीआयचे शिर्डी शहर अध्यक्ष कैलासराव शेजवळ ,शिवसेनेचे नाशिक वाहतूक विभाग शहर अध्यक्ष शेरखान पठाण, सामाजिक कार्यकर्ते कचरू आहिरे ,सम्राट वाचक मंचाचे रत्नाकर  गायकवाड, लोजपाचे कोपरगाव शहर अध्यक्ष मुश्ताक बागवान ,घटनाकार मैत्री संघाचे नितीनराव बनसोडे, निवृत्त पोलीस महापुरे सो. मा. विजय कदम साहेब,अरुण आहिरे ,भास्कर आहिरे,प्रसाद माळी रवि निकम, सुनिल जाधव,संतोष दळवी, पंकज पगार, नाईमभाई शेख, गुरू बनसोडेआर्यन आहिरे सम्राट आहिरे ,विमालबाई बनसोडे, शिल्पा पगारे, अंजली बनसोडे, सौ. ज्योती आहिरे ,अस्मिताताई भोसले आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News