वृक्षलागवड व संवर्धन लोकचळवळ व्हावी - डॉ. राठोड...


वृक्षलागवड व संवर्धन लोकचळवळ व्हावी - डॉ. राठोड...

शेवगावः रोटरी क्लबच्या ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण करताना अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड. समवेत, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, प्रा. किसनराव माने, डॉ. संजय लड्डा, बाळासाहेब चौधरी व इतर

शेवगाव,  प्रतिनिधी | सज्जाद पठाण - दिवसेंदिवस पर्यावरणाचा -हास होत असल्याने भारतातच नव्हे तर जगात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.  त्यामुळे वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन ही लोकचळवळ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अपर पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी केले.

शेवगाव येथील रोटरी क्लबच्या ऑक्सिजन पार्कमध्ये विजयादशमीचे औचित्य साधत डॉ. राठोड यांच्या हस्ते रोटरीच्या फेब्रिकेटेड कार्यालयाचे  भुमिपूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी डॉ. राठोड बोलत बोलत होते.  पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी,  माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, डॉ. मनिषा लड्डा, माजी अध्यक्ष प्रा. अण्णासाहेब दिघे, डॉ. पुरूषोत्तम बिहाणी, प्रदिप बोरूडे आदी उपस्थित होते.

डॉ. राठोड म्हणाले, रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रिय सेवाभावी संस्था आहे. शेवगाव रोटरी क्लबने नगरपरिषदेने दिलेल्या भुखंडावर स्वखर्चाने वृक्षलागवड करीत ऑक्सिजन पार्कची उभारणीचा उपक्रम स्तूत्य आहे.

मागील दोन वर्षांत ऑक्सिजन पार्क मध्ये लावलेल्या वड, पिंपळ, लिंब, शिसम, करंज, भेंडी, जांभळ यासह सप्तपर्णी, बकूळ व इतर फुलझाडे अशी सुमारे २०० झाडांची लागवड व संवर्धनाची पाहणी करून डॉ. राठोड यांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी प्रा. माने यांनी बसस्थानकात कायमस्वरूपी पाणपोई, शाळांना ग्रंथालय वाटप, आरोग्याबाबत जनजागृती, कोव्हिड काळात मास्क व सॅनिटायझरचे कोरोना योद्ध्यांना वितरण यासह रोटरीच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. नगरच्या अपर पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. माने व डॉ. लड्डा यांच्या हस्ते डॉ. राठोड यांचा रोटरीच्या वतीने या वेळी सत्कार करण्यात आला.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News