गेलं दौंड खड्ड्यात | भाग 3, दौंड


गेलं दौंड खड्ड्यात | भाग 3, दौंड

दौंड SRP गेट समोर रस्त्यावर पडलेल्या दगडामुळे दोन दिवसात दोन अपघात,रात्रीच्या वेळी रस्ते अपघातात वाढ

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

दौंड तालुक्यातून चाललेला हायवे रस्ता जसा सुरू झाला आहे तसे अपघात,वाद,खड्डे,अडथळे,खडी,दुभाजक तयार करण्यासाठी लागणारे सिमेंटच्या विटा या मुळे अपघातात वाढ झाली आहे, दोन दिवसात तीन चारचाकीचे  अपघात झाले आहेत, सुदैवाने जीवित हानी झाली नाही,परंतू गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे,रस्त्याच्या अर्धवट कामामुळे व्यवसायावर परिणाम झालाच आहे,असे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे, दौंड नगरमोरी येथे रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे गाडी बाजूने घेताना दगडावर अडकली,तर दौंड SRP F ग्रुप 5 समोर दोन दिवसात एकाच ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दगड न दिसल्यामुळे चारचाकी चे अपघात झाले आहेत,गाडीतील व्यक्ती आणि येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल मशाळकर रवींद्र लोटके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत करून त्या व्यक्तीना पुढील मार्गाला रवाना केले, ठेकेदार नक्की रस्ता पूर्ण करण्यासाठी कशाची वाट पाहात आहेत आणि किती दिवस दौंडकराना असेच झुलवत ठेवणार आहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News