जेऊर कुंभारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा !!


जेऊर कुंभारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे धम्मचक्र प्रवर्तनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण असुन बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी दिनी  दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो.

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात.ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे,

विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश करून भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो.परंतु सध्या कोरोना या महामारी मुळे  शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेऊर कुंभरी येथील बौद्ध अनुयायांनी नागपूर ला न जाता सोशल डिस्टिगशनचे पालन करून गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्रिषरण , पंचशील घेऊन महामानवाला अभिवादन करून साजरा केला.

यावेळी बोलतांना आर पी आय प्रदेश सचिव तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष दिपकराव गायकवाड म्हणाले की धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे खऱ्या अर्थाने समता आणि मानवतेच्या संस्कृतीचा स्वीकार करणारा व माणसाला माणसाचे अधिकार प्रदान करणारा मानव मुक्तीचा दिवस आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष तथा आर पी आय चे प्रदेश सचिव दिपक रावजी गायकवाड,स्मारक समिती उपाध्यक्ष बाबुराव काकडे,सनदी लेखा परीक्षक भास्करराव वकोडे,  शिवराम गायकवाड,चांगदेव गायकवाड,भीमा साळवे,नाना गवई,संजय भालेराव,दिलीप काकडे,सुमित पगारे,निलेश  वाकोडे,साईनाथ गायकवाड, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News