शेती वाटपाच्या वादात काठी गजाने मारहाण !!


शेती वाटपाच्या वादात काठी गजाने  मारहाण !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ रहात असलेल्या दिलीप दिनकर निकम,मोतीराम दिनकर निकम, भूषण दिलीप निकम ,सर्व रा.सुरेगाव शिवार यांनी आपल्याला व आपल्या पतीला शेतजमिन वाटप करण्यावरून गज व कु-हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद शालिनी रमेश निकम यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

   सविस्तर वृत्त असे की सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्याद महिला व तिचा पती रमेश निकम राहतात.त्यांचे जमिन वाटपावरून आपापसात वाद आहे.या वादाचे रूपांतर नुकतेच भांडणात  झाले.व फिर्याद महिलाचा पती व अन्य आरोपी हे भाऊ- भाऊ आहे.

        मात्र त्यांचे जमिनीचे वाटपावरून झालेला वाद आपआपसात मिटला नाही.त्यांचे रूपांतरण भांडणात झाले.काल दुपारी ४:३0 वाजता भांडणाचे रूपांतर इतके विकोपाला जाईल अस वाटत नव्हतं.आरोप दिलीप दिनकर निकम,मारूती दिनकर निकम, भूषण दिलीप निकम, यांनी शिवीगाळ करत गजाने व काठीने आणि कु-हाडीने मारहाण करून पाठीत,हाताचे बोटावर मारून फिर्यादी महिला शालिनी निकम,व रमेश निकम, या पती - पत्नीस जबर मारहाण करून फिर्यादी महिलेचा डावा हात गंभीर दूखापत करून त्यास तडा दिला.व जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सुरेगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.या प्रकरणी कोपरगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असुन गु.र.क्रं ५२८/२०२० भा.द.वि.कायदा कलम ३२६,३२४,५,०४,५०६,३४ प्रमाणे  आरोपिवर गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षण अनिल कटके यांच्या मार्गदर्शनानाखाली पो.हे.काँनस्टेबल अशोक गवसने करत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News