कोरोना सारख्या महामारीला न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याची मानसीकता ठेवावी..बगाटे


कोरोना सारख्या महामारीला न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याची मानसीकता ठेवावी..बगाटे

शिर्डी - राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी,

      कोरोना सारख्या महामारीला न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याची मानसीकता ठेवली तर कोरोना आपल्याला कोणतीच बाधा पोहोचवू शकत नाही, असे प्रतिपादन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले.

      श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या कर्मचा-यांसाठी कोव्हीड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी यासाठी सोशल डिस्टसिंगचे पालन करत आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यशाळेत श्री.बगाटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्वश्री प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, दिलीप उगले, वैद्यकीय संचालक डॉ.नरोडे, वैद्यकीय प्रशासक डॉ.वडगावे, प्राचार्य विकास शिवगजे आणि सभा मंडपात  संस्थानचे विविध विभागातील ५५० कर्मचारी उपस्थित होते.

       या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री.बगाटे म्हणाले की, गेल्या मार्च महिन्यांपासून श्रींचे मंदिर कोव्हीड- १९ या वैश्विक  महामारी सारख्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी बंद केलेले आहे. आता केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन अनलॉकची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. टप्प्या-टप्प्याने विविध सेवा सुविधा सुरळीत करण्याबरोबरच धार्मिकस्थळे, शाळा सुरु होण्याचे संकेत आहेत. जर धार्मिकस्थळे दर्शनासाठी सुरु झाले, तर देशाच्या कानाकोप-यातून भाविक श्रीं चे दर्शनासाठी शिरडीत येतील. त्यामुळे संस्थानचे विविध विभागातील कर्मचारी साईभक्तांना सेवा देण्यासाठी कर्तव्यावर हजर राहणार आहेत. तसेच बहुतांशी कर्मचारी हे या महामारीच्या आजाराच्या भितीच्या छायेत काम करत आहेत. या आजाराविषयी मोठया प्रमाणात गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यामुळे कर्मचा-यांनी खबरदारी घेत मला कोणताच आजार होणार नाही, ही मानसिकता ठेवली तर खरोखरच कोणताच आजार आपल्याला बाधा पोहोचवू शकत नाही. त्यासाठी मानसिकता प्रबळ ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे असल्याचे सांगत त्यासाठी कोणती आयुर्वेदिक औषधे घेतली पाहीजे, याची माहिती देत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक योगा व प्राणायम यांची प्रात्यक्षिकेही श्री.बगाटे यांनी करुन दाखविली.

       संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आभार मानले तर श्री साईबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News