शिरूर येथील इंडिकॅश ए टी एम चोरीचा गुन्हा उघडकीस, दोन चोरटे अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


शिरूर येथील इंडिकॅश ए टी एम चोरीचा गुन्हा उघडकीस, दोन चोरटे अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

- पुणे नगर हायवे लगत असलेले इंडिकॅश ए टी एम तीन दिवसापूर्वी अज्ञात चोरट्यानी फोडून रक्कम चोरल्याचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता,त्याचा तपास करत असताना दि 23/10/2020 रोजी *शिरूर पोलिस  पोलिस स्टेशन गुन्हा र नं 608 /2020 भा द वी  461,380  वरील गुन्हा दि 21/10/2020 रोजी घडला होता* वरील गुन्ह्यात शिरूर पो स्टे हद्दीतील सरदवाडी येथील पुणे नगर हायवे लगत असणारे इंडिकॅश कंपनी  चे atm मशीन हे गॅस कटर च्या साह्याने कट करून त्यातील 73900 रुपये ची रोख रक्कम ही अज्ञात चोरट्यानी चोरुन नेले होती सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना cc फुटेज   आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आज दि 23/10/2020 रोजी शिक्रापूर येथे चाकण चौक येथे  दोन  संशयित इसम  नामे १)विकास रामजी तोरकड वय 24 वर्षे रा बजरंगवाडी शिक्रापूर, ता शिरूर मूळ रा पारोडा ता जि हिंगोली २)सुनिल रामजी तोरकड वय 26वर्षे रा

 बजरंगवाडी शिक्रापूर, ता शिरूर मूळ रा पारोडा ता जि हिंगोली  वरील इसम यांनी सदरचा गुन्हा  हा त्यांचे मित्रांन सोबत केल्याचे सांगत आहेत अशा रीतीने सदरचा गुन्हा उघडकीस आणून वरील दोन संशयियत इसमाना वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास करीता  शिरूर  पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे 

 *सदरील कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते सो तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे , asi दत्तात्रय गिरमकर ,asi दयानंद लिमन पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर  पोलिस नाईक जनार्दन शेळके पोलिस नाईक विजय कांचन, पोलिस नाईक राजू मोमिन पोलिस नाईक चंद्रकांत जाधव पोलिस कॉ धिरज जाधव , चा. पो. कॉ. दगडू वीरकर यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News