अखिल वारकरी संघ कोपरगाव तालुका महीला संघटक प्रमुख पदी ह.भ.प.मिराताई महाराज वाकचौरे !!


अखिल वारकरी संघ कोपरगाव तालुका महीला संघटक प्रमुख पदी ह.भ.प.मिराताई महाराज वाकचौरे !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

अखिल वारकरी संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका महीला संघटक प्रमुख या पदावर ह.भ.प.मिराताई महाराज वाकचौरे मु.पो.संवत्सर रामवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदरील नियुक्ती अखिल वारकरी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प.श्री.मच्छिंद्र महाराज धानेपकर यांच्या सहमताने व जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.श्री.महेशजी महाराज हरवणे यांनी केलीली आहे 

ह.भ.प.मिराताई महाराज वाकचौरे यांनी या अगोदर   सवंत्सर येथे रामवाडी या ठिकाणी श्रीराम मंदिरासाठी एक खोली स्व:खर्चाने बांधून दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी गावागावातून महिला सप्ताह करून सुंदर कार्यक्रमही केले. किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी महिलांना प्रोत्साहन केले व त्यांना अनेक दिंडी मधून हरिपाठ व काकडा भजन यां विषयी त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव व अध्यात्मिक गोडवा निर्माण केला.

या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी ह.भ.प.मिराताई वाकचौरे यांचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ह.भ.प.मिराताई महाराज वाकचौरे यांचा जिल्हा अध्यक्ष उत्तर अहमदनगर श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व कोपरगाव तालुका अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे अध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे,सौ.छायाताई काळे यांनी श्रीफळ,शाल देऊन सत्कार केला या प्रसंगी ह.भ.प.मथुराबाई विठ्ठलराव वाकचौरे,श्री.ज्ञानेश्वरजी विठ्ठलराव वाकचौरे व सौ.दिपालीताई ज्ञानेश्वरजी वाकचौरे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News