समन्वय समितीच्या अध्यक्षपदी उत्तमराव चरमळ!!


समन्वय समितीच्या अध्यक्षपदी उत्तमराव चरमळ!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार समनव्य समितीच्या अध्यक्षपदी उत्तमराव चरमळ यांची तर उपाध्यक्ष पदी राजेंद्र देवकर यांची सर्वानुमते करण्यात आली आहे.

कोपरगाव येथे स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी तालुकाध्यक्ष कैलास बोरावके हे होते.

       तालुक्यात कोरोना काळात सर्व दुकानदारांनी जीव मुठीत धरून धान्य वाटप केले दुकानदारांना धान्य वाटप करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पॉस मशीन, तसेच सर्व्हर प्रॉब्लेम यासह इतर समस्येवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी मंडळानुसार दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी एका समनव्य समितीची स्थापना करण्यात आली.तालुक्यातील पाच मंडळ व एक शहर प्रतिनिधी अशी एकूण सहा प्रतिनिधींची समिती तयार करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष कैलास बोरावके,पांडुरंग नरोडे,अशोक लकारे, राजेंद्र गवारे,जनार्दन जगताप,बाळासाहेब दवांगे,फकीर टेके,सुनील दराडे, मोहन ढेपले,रवींद्र बागुल ,राजेंद्र होन, किरण डांगे,रवींद्र पोळ,सागर नरोडे,शीतल बडजाते,अनुप साळुंके,मनोहर होन ,निलेश गुढगे,आप्पासाहेब शिंदे, संजय खिलारी, संभाजी सिंनगर, अनिल चव्हाण, भवर,राजाराम शिंदे ,पप्पू बागुल आदींसह दुकानदार उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News