वादळी वाऱ्याने मुर्शतपूर, चांदगव्हाण परिसरात घरांचे नुकसान !! आ.आशुतोष काळेंनी पाहणी करून पंचनाम्याच्या दिल्या सूचना !


वादळी वाऱ्याने मुर्शतपूर, चांदगव्हाण परिसरात घरांचे नुकसान !!  आ.आशुतोष काळेंनी पाहणी करून पंचनाम्याच्या दिल्या सूचना !

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

                       परतीचा पाऊस अजूनही जायचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर, चांदगव्हाण परिसरात दाणादाण उडवून देत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेस चंद्रे यांना पंचनामे करण्याच्या सूचना देताच पंचनामे देखील करण्यात आले आहे.

                         गुरुवार (दि.२२) रोजी मुर्शतपूर, चांदगव्हाण आदी गावांमध्ये रात्री अचानक आलेला वादळी वारा व झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून केल्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजल्यामुळे मोठे नुकसान होवून संसार उघड्यावर पडला आहे. तसेच काही ठिकाणी घराच्या भिंती पडून जनावरांच्या पत्र्याचे शेड (गोठे) उडून गेले आहे. वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही ठिकाणी शेतातील उभी पिके जमिनीवर पडून पिकांचे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान मोठे झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरांच्या झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांची आपुलकीने चौकशी करून नागरिकांना दिलासा दिला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या महसूल विभागाला सूचना देताच तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात पंचनामे  करण्यात सुरुवात देखील झाली. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल तातडीने सादर करा. नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.  यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे, अनिल दवंगे, सुनील गिरमे, विष्णू शिंदे, नितीन शिंदे, शिवाजी बाचकर, विक्रम बाचकर, नुकसानग्रस्त नागरिक आदी उपस्थित होते.


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News