श्री साईबाबांची पुण्यतिथी साजरी होणार,,,, बगाटे


श्री साईबाबांची पुण्यतिथी साजरी  होणार,,,, बगाटे

शिर्डी -राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही शनिवार दिनांक २४ ऑक्‍टोबर ते सोमवार दिनांक २६ ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत श्री साईबाबांची १०२ वा श्रीं चाा पुण्‍यतिथी उत्सव प्रतिकात्‍मक स्‍वरुपात साजरा करण्‍यात येत आहे. कोरोना व्‍हायरसच्‍या  पार्श्‍वभूमीवर यावर्षीचा उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार असून उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्‍यात येणा-या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळीकरीता गांवकरी/साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परीसरात व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.               श्री.बगाटे म्‍हणाले, यावर्षी जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे दिनांक २४ ऑक्‍टोबर ते सोमवार दिनांक २६ ऑक्‍टोबर २०२० याकालावधीत साजरा करण्‍यात येणारा श्रीं चा पुण्‍यतिथी उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे. तसेच श्रीं चा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्‍याअनुषंगाने उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी आयोजित करण्‍यात येणा-या भिक्षाझोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तरी गांवकरी व साईभक्‍तांनी भिक्षाझोळीत दान भिक्षा देतांना मास्‍कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करुन भिक्षाझोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी. तसेच संस्‍थानचे संरक्षण व दान भिक्षा स्विकारणारे कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहान संस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. 

          श्रीं च्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी शनिवार दिनांक २४ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता श्रीं च्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०५.१५ वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०५.४० वाजता श्रीं चे मंगलस्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रीं ची शेजारती होणार आहे. त्‍यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल, परंतु श्री साईसच्‍चरित अखंड पारायण श्री द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहील.

          रविवार, दिनांक २५ ऑक्‍टोबर हा श्रीं चे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रीं च्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ०८.३० ते ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रीं चे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. तर रात्रौ १०.३० वाजता श्रीं ची शेजारती होईल. 

       उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ०६.३० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता श्रीं ची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.०० वाजता श्रीं ची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजारती होणार असल्‍याचे सांगुन उत्‍सव कालावधीतील सर्व विधी मर्यादित संख्‍येने सामाजिक अंतर पालन करुन करण्‍यात येणार असल्‍याचे ही श्री.बगाटे यांनी सांगितले. 

        हा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍य लेखाधिकारी  बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News