शेवगाव - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लेखी निवेदन देताना शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी


शेवगाव - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लेखी निवेदन देताना शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी

शेवगाव प्रतिनिधी :सज्जाद पठाण,

विनोद फलके, बाळासाहेब डमाळ, पांडुरंग नांगरे, बाळकृष्ण कंठाळी, बबनराव ढाकणे  आदी वीरभुमी वैद्यकिय देयकाच्या आजारात कोव्हिड १९ आजाराचा समावेश करावा तसेच प्राथमिक शिक्षकांना वैद्यकिय उपचारासाठी कॅशलेश  योजना लागू करावी अशी मागणी शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या बाबतचे लेखी निवेदन शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी ( दि. २२ ) दिले.  या वेळी प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विनोद फलके, सदिच्छा मंडळाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब डमाळ, शिक्षक नेते बाळकृष्ण कंठाळी, सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नांगरे, बबनराव ढाकणे, राजू घुगरे आदी उपस्थित होते.

बीएलओसह इतर अशैक्षणिक कामांतून प्राथमिक शिक्षकांची मुक्तता करावी, आंतर जिल्हा बदली शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना द्यावी, केंद्रप्रमुख भरतीत बीए बीएड प्राथमिक शिक्षकांना प्राधान्य द्यावे, २४ वर्षे सेवा झालेल्या सर्वांना निवड श्रेणीचा लाभ द्यावा, विभागीय आयुक्त यांनी विस्थापीत शिक्षकांच्या बदलीसाठी दिलेल्या आदेशाची जिल्हा स्तरावर कार्यवाही करावी,  प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला सीएमपी प्रणालीद्वारे करावे आदी मागण्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News