पुणे सोलापूर हायवेवर पाटस टोलनाक्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर DYSP राहुल धस यांची धडक कारवाई, चालक मालक यांच्यावर गुन्हे दाखल


पुणे सोलापूर हायवेवर पाटस टोलनाक्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर DYSP राहुल धस यांची धडक कारवाई, चालक मालक यांच्यावर गुन्हे दाखल

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर हायवेवर पाटस टोलनाक्यावर दौंड चे उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक वर धडक करून त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत,रात्रीच्या गस्तीवर असणारे पोलीस नाईक डी बी वायकर,पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गाढवे,पो कॉन्स्टेबल अमोल गवळी याना पुणे सोलापूर हायवेने पाटस गावच्या हद्दीत अवैध  उत्खनन करून चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले,पोलिसांनी  चौकशी केली असता एक जण पळून गेला तर इतर दोन ट्रकचे चालकांना ताब्यात घेऊन पाटस दुरक्षेत्र येथे देण्यात आले आहे,यामध्ये भारत बेंज कंपनीचा ट्रक नंबर 1) MH  14 CP 1313, टाटा कंपनीचा 2)MH 12 AQ 1230, 3) भारत बेंज कंपनीचा MH 42 AQ 1724  पंधरा ब्रास वाळू सह तीन ट्रक असा 11 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि चालक अशोक पांडुरंग भुजबळ वय 36 राहणार जलालपूर तालुका कर्जत आणि सत्यवान शिवाजी गंगावणे वय 55 राहणार अजनुज तालुका श्रीगोंदा यांना ताब्यात घेण्यात आले असून एक चालक रात्रीच्या अंधारात फरार झाला आहे, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांनी दौंड हद्दीत अवैध दारू साठा उध्वस्त केला,शिरूर हद्दीत तीन पत्ते क्लबवर छापा आणि आता पाटस हद्दीत अवैध वाळू वर धडक कारवाई करून त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत, या गुन्ह्याचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News