मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने डॉ. गिरीश कुलकर्णी यांना दुरितांची स्नेह माऊली सन्मान जाहीर..पाडव्याच्या दिवशी होणार सन्मान


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने  डॉ. गिरीश कुलकर्णी यांना दुरितांची स्नेह माऊली सन्मान जाहीर..पाडव्याच्या दिवशी होणार सन्मान

दिवाळीत एक दिवा स्नेहालयासाठी लावून संस्थेला मदत करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) सामजिक कार्य उभे करुन वंचितांचे आश्रू पुसण्यासह त्यांना मायेने आधार देणारे स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांना मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने दुरितांची स्नेह माऊली सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पाडव्याच्या दिवशी कुलकर्णी यांचा या उपाधीने सन्मान केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर दिवाळीत एक दिवा स्नेहालयासाठी लावून आपल्या परीने स्नेहालयाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयाच्या माध्यमातून मोठ्या उंचीचे सामाजिक कार्य उभे केले आहे. यापुर्वीच त्यांना भारत सरकारचा पद्म पुरस्कार मिळणे अपेक्षित होता. मात्र हा पुरस्कार न मिळाल्याने त्यांना सर्वसामान्य जनतेच्या वतीने हा सन्मान बहाल केला जाणार आहे. त्यांच्या सामाजिक कार्यानी दीन, दुबळे व वंचित घटकांना मोठा आधार मिळाला आहे. अंधकारात चाचपडणार्‍यांचे जीवन त्यांनी प्रकाशमान केले. याचा एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने दिवाळीत एक दिवा स्नेहालयाच्या नावाने लावण्यात येणार असल्याचे देखील संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

गिरीश कुलकर्णी यांनी वेश्या व्यवसायात ओढले गेलेल्या महिलांचे पुनर्वसनासाठी कार्य सुरु आहे. ते आपले आयुष्य समाजकार्यासाठी वेचत आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा वैचारिक वारसा ते खर्‍या अर्थाने पुढे चालवत आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत सांगितलेल्या दुरितांचे तिमिर जावो या पंक्तीप्रमाणे त्यांचे कार्य सुरु आहे. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे त्यांचे कार्य आहे. वंचितांना त्यांनी मोठा आधार दिला असून, त्यांचे कार्य दिशादर्शक आहे. घरकुल वंचितांचे घरे होण्यासाठी देखील ते प्रयत्नशील असल्याने हा प्रकल्प देखील निश्‍चित मार्गी लागणार असल्याचे  अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News