लोणावळ्यात आईसक्रीम डिस्ट्रिब्युटर कडे सापडले २ गावठी पिस्टल ,१ जिवंत काडतुस, लोखंडी कोयता,रँबो चाकू जप्त आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुणे ग्रा. LCB शाखेची कामगिरी.


लोणावळ्यात आईसक्रीम डिस्ट्रिब्युटर कडे सापडले २ गावठी पिस्टल ,१ जिवंत  काडतुस, लोखंडी कोयता,रँबो चाकू जप्त आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुणे ग्रा. LCB शाखेची कामगिरी.

विठ्ठल होले, विशेष प्रतिनिधी : लोणावळा शहरात एका आईस्क्रीम विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडले आहेत,आज रोजी पुणे ग्रामीण LCB टिमने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांना मिळालेली गोपनीय बातमी की, लोणावळा शहर पो.स्टे. हद्दीत कल्पतरू हास्पिटल च्या समोर  वर्धमान सोसायटी गुरुकृपा डिस्ट्रीबुशन लोणावळा येथिल इसम नामे *सूरज विजय अगरवाल वय 40 रा. कल्पतरू हास्पिटल च्या समोर  वर्धमान सोसायटी  ता मावळ पुणे* हा २ गावठी पिस्टल, बाळगून आहे त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता  त्याच्या कंबरेला खोचलेले गावठी पिस्टल मिळून आले  त्याचे मॅक्झईन चेक केले असता एक जिवंत काडतुस मिळून आले तसेच त्याचे जवळ गोडऊन मध्ये एका रूमच्या बाहेर चार कप्पे असलेले लोखंडी रॅक ची पाहणी केली असता आणखीन एक गावठी कट्टा तसेच कोयता व रेम्बो चाकू मिळून आले सदरचे विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेले  *२ गावठी पिस्टल  १ जिवंत  काडतुस, लोखंडी कोयता , रँबो चाकू असा एकुण किं.रु. १,००,९००/ - चा* मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पो.स्टे. चे ताब्यात दिलेले आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,पो.उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,

सहा फौ दत्तात्रय जगताप,पो हवा सुनील जावळे,पोहवा. प्रकाश वाघमारे, पो हवा मुकुंद आयचीत,पो हवा प्रमोद नवले,पोना. लियाकत मुजावर,पो शि सुधीर अहिवळे,पो.शि अक्षय नवले,पो.शि प्रसन्नजीत घाडगे,पो शि बाळासाहेब खडके चा.पो शी समाधान नाईकनवरे यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News