मन्दिरे उघडण्यासाठी विश्वहिंदू परिषदेचे आंदोलन


मन्दिरे उघडण्यासाठी विश्वहिंदू परिषदेचे आंदोलन

नगर (-प्रतिनिधी संजय सावंत) राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषद आदरणीय संतांच्या मार्गदर्शनात महा अंदोलनाची घोषणा करीत आहे.शनिवार दि.२४ ऑक्टोम्बर २०२० रोजी एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात महाआरतीने हे आंदोलन करीत आहे.माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे संध्याकाळी ५ वाजता विश्वहिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे.जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,कार्याध्यक्ष अँड जय भोसले,मठ मंदिर समितीचे सम्पर्क प्रमुख हरिभाऊ डोळसे यांच्या उपस्थित हे आंदोलन होणार आहे.                                          कोरोनाच्या जीवघेण्या कालखन्डानंतर अनलॉक ची प्रक्रिया सुरु झाली आहे.राज्यात आज बार,हॉटेल्स ,मॉल्स,मेट्रो तसेच महिलांसाठी लोकल रेल्वे सुरु झाली आहे.व दसऱ्या पासून व्यायाम शाळा व जिम्स सुरु होत आहेत.परंतु राज्यातील मन्दिरे बंदच आहेत.हिंदू समाज हा अत्यन्त धार्मिक असून प्रत्येक संकटाच्या काळात हिंदू समाज देवाची उपासना करून मनशांती मिळवून तणावमुक्त होत असतो .  संपूर्ण राज्य अनलॉक करीत असताना अनेकदा पत्रव्यवहार करून सरकारने मंदिरे का बंद ठेवली आहे ? हे कळत नाही.म्हणून विश्वहिंदू परिषद आदरणीय संतांच्या मार्गदर्शनात महाअंदोलनाची घोषणा करीत आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News