शिरुरच्या सरदवाडी येथे एटीएम फोडुन 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला


शिरुरच्या सरदवाडी येथे एटीएम फोडुन 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

शिरूर प्रतिनिधी. (गजानन गावडे) शिरूर पोलीस स्टेशन हददीमधील सदरवाडी ता.शिरूर येथील एटीएम फोडुन अज्ञात चोरट्याने ७३ हजार ९०० चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबत महेश आदिनाथ भारती यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

     याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरदवाडी ता.शिरुर येथील टाटा इंडिकॅश बॅकेचे एटीएम बुधवार दि.२१/१०/२०२० रोजी पहाटे तीन ते सहा वाजण्याच्यासुमारास अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने फोडुन ७३ हजार ९०० रूपये चोरून नेली असल्याचा गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे हे करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News