कोपरगावच्या कन्येला तैवान विद्यापिठाची पीएच.डी पदवी !!कोल्हे कुटुंबाने केलेअभिनंदन !


कोपरगावच्या कन्येला तैवान विद्यापिठाची पीएच.डी पदवी !!कोल्हे कुटुंबाने केलेअभिनंदन !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगावच्या सुकन्या डॉ सौ पल्लवी चौधरी-जपे पाटील यांना रसायनशास्त्रातील संशोधनाबद्दल तैवान येथील विद्यापीठाने पीएच.डी प्रदान केली असुन त्यांच्या या यशाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे साहेब,माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे,कोपरगाव औद्योगिक वसाहती चे चेअरमन विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ सौ पल्लवी चौधरी-जपे यांचे माहेर कोपरगावचे असून त्या सौ नयना व इंजिनीयर बापूराव जपे रा शारदा नगर कोपरगाव यांच्या जेष्ठ कन्या व नगरसेविका श्रीमती ताराबाई गणपत जपे सभापती महिला व बालकल्याण कोपरगाव नगरपरिषद यांच्या पुतणी आहेत

डॉक्टर पल्लवी यांनी एम एस सी सद्गुरू गंगागिरी महाराज कॉलेज(SSGM)कोपरगाव मधून 2012 मध्ये पूर्ण केले त्यानंतर 2013/14 साली तैवान येथील चियायी कंट्री या शहरांमध्ये जगभरातील नामांकित विद्यापीठ नॅशनल च्युंन्ग चॅन्ग युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनासाठी प्रवेश मिळविला मागील पाच-सहा वर्षे अथक अभ्यास परिश्रम संशोधन करून त्यांनी तीन संशोधन पूर्ण केले असुन रसायन शास्त्रातील त्यांचे संशोधनाचे एक शोध निबंध अमेरिकेतील सायन्स जनरल  मध्ये प्रसिद्ध झाले(1)एफ ओ पी आर(2)बायोसेंसोर फाॅर अल्ट्रा सेन्सिटिव्ह डिटेक्शन ऑफ बीटा लॅक्टोमस अँटी बायोटिक्स(3) पेस्टिसाइड अँड सिंगल न्यूक्लिओ साईड पाॅलीमाफिसम इन डी एन ए असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.*

 वरीलपैकी(2)चे संशोधन एक्स-रे मशीन मध्ये वापरण्यात येणाऱ्या द्रव्या बाबत असुन तैवान मधील डॉक्टरांनीही हे संशोधन अतिशय उत्कृष्ट व उपयुक्त ठरले असल्याचा निर्वाळा दिला आहे त्यांच्या वरील संशोधनाबाबत नॅशनल च्युन्ग चॅन्ग युनिव्हर्सिटीने त्यांना पीएच.डी प्रदान केली अगोदर 2018 त्यांचे पती डॉक्टर प्रकाश चौधरी(चितळी जळगाव ता.राहता)यांनाही त्याच विद्यापीठाने पीएच.डी प्रदान केली त्यानंतर त्यांनी तेथेच पोस्ट डॉक्टरेट केले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहून डॉक्टर पल्लवी चौधरी-जपे यांनी पीएच.डी मिळवल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News