संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.धिराज भास्कर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी !!


संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.धिराज भास्कर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 संजीवनी येथील यांत्रिकी संशोधन केंद्रातून पीएचडी पूर्ण करणारे ते पहिले व्यक्ती असुन एफईएम वापरुन लॅमिनेटेड कंपोजिट प्लेट्सच्या विश्लेषणाबद्दल प्रबंध सादर केला आहे. या संशोधन कार्यात त्यांना डॉ.ए.जी.ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले आहे .

डॉ.धिराज भास्कर यांनी संजीवनी संस्थेचे विश्वस्त माननीय नितीनदादा कोल्हे आणि  माननीय अमितदादा कोल्हे यांचे पीएचडी करण्याची संधी उपलब्ध   करुन दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानले.तसेच संजीवनी इंजीनियरिंग कॉलेज चे प्राचार्य श्री डी एन क्यातन्वार तसेच पीएचडी मार्गदर्शक डॉ श्री ए जी ठाकुर व डॉ ए एस सय्यद यांचे पीएचडी च्या कार्यात विशेष मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. या कार्यात श्री निलेश ढोकने यांचे विशेष सहकार्य लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News