अहमदनगरच्या महापौर आणि आयुक्तांविरुद्ध कठोर कारवाई करा.


अहमदनगरच्या महापौर आणि आयुक्तांविरुद्ध कठोर कारवाई करा.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)

महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदाच्या निवडीसंदर्भात मनपा अधिनियम १९४९, कलम ३ नियम क्र. ४ च्या तरतूदीचे उल्लंघन करण्यात आले असून या निवडीसाठी दि. ११ सप्टेंबरला जी सभा पार पडली त्या सभेतला ठराव क्र. ३ विखंडीत करुन नामनिर्देशानादवारे निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे. तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापौर बाबासाहेब वाकळे आणि आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केली आहे.


यासंदर्भात महासत्ता भारतशी बोलताना ते म्हणाले की  महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे महापौर आणि आयुक्त यांनी स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्याऐवजी मनपाचे नियम पायदळी तुडविले आहेत. तसेच मनपा आयुक्त मायकलवार यांनी महानगरपालिका सभेचा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.महानगरपालिकेच्या पहिल्या बैठकीत महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर ५ व्यक्तींची नामनिर्देशित महापालिका सदस्य म्हणून महानगरपालिका करील असा नियम आहे. या नियमाच्या कलम ४ नुसार नामनिर्देशनासाठी अनुक्रमणिकेतल्या [क] ते [छ] प्रमाणे अर्हता धारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीची नामनिर्देशन करण्यासाठी आयुक्‍त मनपामधील सभागृह नेते विरोधी पक्ष नेते आणि प्रत्येक मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाचे किंवा गटाचे नेत्याशी विचार विनिमय करुन आणि अशा पक्षाचे आणि गटाचे तौलनिक संख्याबळ विचारात घेऊन महानगरपालिकेला योग्य व्यक्तीच्या नावाची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी शिफारस करतील

अशी उक्त अधिनियम आणि नियमातील तरतूद आहे. या तरतुदीनुसार आयुक्त मायकलवार यांनी कार्यवाही करणे हे अपेक्षित असून त्यांच्यावर बंधनकारक आहे. परंतु आयुक्त मायकलवार यांनी या सर्व नियमांचे उल्लंघन करुन महानगरपालिकेस त्याप्रमाणे शिफारस न करता ता. ११ जून २०२० रोजी स्विकृत सदस्य निवडीबाबत जे प्रस्ताव सादर केलेले आहेत त्यामध्ये दि. १० जून रोजीच्या सभेत झालेल्या ६ व्या 6 या ठरावाचा कोणताही उल्ठेख केलेला नाही. सदरच्या ठरावाबाबतची माहिती महानगरपालिकेला कळविलेली नाही. त्यांनी नगरविकास विभागाचे शासन परिपत्रक दि. ६/७/ २०२० च्या मार्गदर्शक तत्वानुसार महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह विविध समित्यांवर सदस्य नामनिर्देशन करताना अनुसरायची कार्यपध्दत प्रमाणे या प्रकरणात कार्यवाही केलेली आहे.

त्यांनी सदरचा प्रस्ताव पाठविताना त्यामध्ये नामनिर्देशानाद्वारे निवडीच्या सदस्यांच्या नावाचा तपशील कळविलेले नाहीत. सदरचा प्रस्ताव पाठविल्यानंतर सभेची सूचनापत्रक दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी काढल्यानंतर सभेच्या आदल्या दिवशी आयुक्‍त यांनी कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी विविध वरील पक्षांच्या गटनेत्यांकडून वरीलप्रमाणे ५ नावे प्राप्त करुन घेतली.त्याची घोषणा महानगरपालिका सभेमध्ये करण्यात आली. मात्र सदरची बाब पूर्णपणे गैर असून कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. महानगरपालिकेस उक्त तरतूदीनुसार प्रत्येकी क्षेत्राचे अनुभव आणि ज्ञान प्राप्त असलेल्या [क] ते [छ] प्रमाणे अर्हता असणा-या प्रत्येकी एका व्यक्‍तीची पालिका सदस्य म्हणून नामनिर्देशन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा असे कायद्याद्वारे सांगण्यात आलेले आहे.मात्र या तरतूदीप्रमाण त्या त्या क्षेत्रातील ज्ञानप्राप्त व्यक्तींची निवड करण्यात आलेली नाही. ज्या व्यक्‍तीने त्या त्या क्षेत्रातील ज्ञान प्राप्त केलेले आहे, त्यांच्या अनुभवाबाबत अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यात आलेले नाही. त्याचबरोबर दि. १० सप्टेंबर २०२० च्या ठरावाद्वारे ज्या व्यक्‍तींना अपात्र ठरविण्यात आलेले आहे त्याच व्यक्तींची नामनिर्देशानाद्वारे निवड करण्यात आलेली आहे.

अशी वस्तुस्थिती असताना आयुक्त मायकलवार यांनी महानगरपालिका सभा क्र. ३ ठराव दि. १ सप्टेंबर २०२० सदरचा ठराव विखंडीत करण्याबाबत शासनाकडे शिफारस करणे आवश्यक असताना आयुक्तांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर केलेली आहे.  त्याचप्रमाणे विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर पहिल्या सभेत नगरसचिव प्रस्ताव क्र. २३ जानेवारी २०१९ च्या अनुषंगाने विशेष सभा बोलावून स्विकृत सदस्य निवडीबाबत कार्यवाही करणे आवश्यक असताना त्यांनीही आपले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केलेला आहे. महापौर वाकळे यांनी अधिकार आणि पदाचा दुरुपयोग करुन स्विकृत सदस्य निवडीचा ठराव पारित केलेला आहे.या प्रस्तावाच्या अनुषंगाने फेरप्रस्ताव नगरसचिव विभागने ता . 3/1/2020 रोजी सादर केला . त्याप्रमाणे नगरसचिव यांनी विषयपत्रिका दि . 3/1/2020 रोजी काढून सभा क्र . 6 दि . 10/1/2020 रोजी विशेष सभा आयोजित केल्याबाबत कळविले.


सभेपूर्वी तत्कालिन आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे स्वीकृत सदस्य नामनिर्देशित होण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांकडून प्राप्त झालेली नावे 1 ] विपुल शेटीया 2 ] बाबासाहेब गाडळकर शिवसेना गटनेत्या कडून 1 ] मदन आढाव 2 ] संग्राम शेळके भारतीय जनता पक्ष गटनेत्याकडून रामदास आंधळे यांची नावे प्राप्त झाली होती.


सदर व्यक्ती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदीनुसार नामनिर्देशीत सदस्याकरीता पात्र ठरत नसल्याने अपात्र ठरत असल्याबाबत आयुक्त यांनी शिफारस केली व त्या अनुषंगाने महानगरपालिका सभेमध्ये महापौर यांनी त्यावर शिक्कामोर्तब करुन ती नावे अपात्र ठरविल्या बाबत कार्यवाही केली.


त्यानंतर नगरसचिव कार्यालयाने त्यांच्या कार्यालयाचे ता . 11/6/2020 रोजी पालिका सदस्यांचे नामनिर्देशन करण्याबाबत प्रस्ताव सादर केले आणि विद्यमान आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी प्रस्ताव प्रकरणी नगरविकास विभागाचे शासन परिपत्रक प्रमाणे कार्यवाही ठेवण्याबाबत कळवावेअशी सूचना करुन त्याप्रमाणे महापौर वाकळे यांनी दि .25 / 9 / 2020 रोजी सदर प्रस्तावाप्रमाणे विशेष महासभा होण्याबाबत नगरसचिव यांना सुचना केली. त्यानुसार महानगरपालिका सभा क्र . 3 दिनांक 1/10/2020 रोजी सभा आयोजित करण्यात आली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी  शिवसेना  भाजपा या पक्षांचे गटनेत्यांकडून नामनिर्देशनाद्वारे पुढीलप्रमाणे नावे सुचविण्यात आली. राष्ट्रवादी गटनेत्याकडून 1 ] विपुल शेटीया 2 ] बाबासाहेब गाडळकर मयत झाल्याने त्यांच्याऐवजी राजेश कातोरे यांचे नाव  शिवसेना गटनेत्या कडून 1 ] मदन आढाव 2 ] संग्राम शेळके भारतीय जनता पक्ष गटनेत्याकडून रामदास आंधळे या नावांना ऑनलाईनद्वारे सभेत महापौर वाकळे यांनी मान्यता दिली. परंतु आयुक्त मायकलवार यांनी एका वृत्तपत्रात दि .2 / 10 / 2020 प्रसिध्द झालेल्या वृत्तात असे खुलासे केले की  आक्षेप घेतल्यास नगरसेवकच जबाबदार राहतील. स्वीकृत नगरसेवकपदासाठी नगरसेवकांनी कागदपत्रे सादर केलेली आहेत ही माहिती दताना स्वतः प्रमाणित केलेली आहे. त्यामुळे कोणी आक्षेप घेतल्यास ते स्वतः जबाबदार असतील असे आयुक्त मायकलवार यांनी स्पष्ट केले. सदरची बाब उक्त तरतूदींचे उल्लंघन करणारी असल्याने शासनाने या दोन्हीही महत्वाच्या पदांवरील व्यक्तींविरुद्ध {महापौर बाबासाहेब वाकळे आणि आयुक्त श्रीकांत मायकलवार} शिस्तभंगाची कारवाई करावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News