पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची सूचना


पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची सूचना

शिर्डी, राजेंद्र दूनबळे

परतीच्या पावसाने राज्यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

            परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासन कार्य करत असून  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तूर,सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येणार आहेत. 

मंत्रीमहोदयांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहेत. 

            पठार भागातील वरवंडी, खांबा, कवठे मलकापूर ,बिरेवाडी ,साकूर, जांबूत बुद्रुक जांबुत खुर्द या गावांमध्ये तहसीलदार अमोल निकम, इंद्रजीत थोरात यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, सभापती मीराताई शेटे, उपसभापती नवनाथ आरगडे इंद्रजीत खेमनर किरण मिंडे, पांडुरंग सागर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News