साई संस्थांन च्या जनसंपर्क अधीकारी पदी, कर्तव्य दक्ष,उच्च विभूषित, विविध भाषेचे ज्ञान असलेले अधिकारी नियुक्त करा....लोकचंदाणी


साई संस्थांन च्या जनसंपर्क अधीकारी पदी, कर्तव्य दक्ष,उच्च विभूषित, विविध भाषेचे ज्ञान असलेले अधिकारी नियुक्त करा....लोकचंदाणी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे

शिर्डी शहरात असलेल्या साईबाबा संस्थान मध्ये जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे अकाली निधन झाले त्यांच्या जागेवर आपल्या ला संधी मिळावी यासाठी काही जनांनी थेट साईबाबा संस्थान सह राज्य पातळीवर फिल्डीग लावून या पदावर संधी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केला आहे असे असले तरी वर्षाकाठी तीन कोटी साईभक्त शिर्डी शहरात साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येतात अशावेळी या पदासाठी नेमणूक करताना  जास्त भाषा येणारा उच्च विभुषीत  व साईबाबा संस्थान प्रगतीसाठी योग्य असलेल्या व्यक्तीलाच संधी मिळाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेश लोकचंदाणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे

     निवृत्त अधिकारी शामसुंदर शहाणे यांना देखील सहा ते सात भाषा येत होत्या  या नंतर चे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी देखील साईबाबा संस्थान च्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले होते पण काही दिवसांपूर्वी कोरोणा आजाराने निधन झाले त्या नंतर हे पद रिक्त आहे सध्या साईबाबा मंदिर हे 22मार्च पासून बंद आहे याला जवळपास आठ महिने उलटून गेले आहे लवकरच लगतच्या काळात साईबाबा मंदिर सुरू होण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहे अशा वेळी या  विभागाचा    नेहमीच व्हि आय पी उद्योजक उद्योगपती दानशूर देशपातळीवर असलेले राजकीय पदाधिकारी यांचा नेहमीच संपर्क येत असतो अशावेळी या पदासाठी नियुक्ती करताना साईबाबा संस्थान ने या सर्व बारीक सारीक बाबींची पडताळणी करून या जनसंपर्क पदासाठी नियुक्ती करताना याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  न्याय व विधी विभाग  जिल्हाधिकारी  अ नगर व साईबाबा संस्थान कार्यकारी अधिकारी शिर्डी यांना पाठवलेल्या निवेदनात आर टी आय कार्यकर्ते जितेश मनोहरलाल लोकचंदाणी यांनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News