प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शिर्डी उपविभागात कोरोना नियंत्रणात :उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे


प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शिर्डी उपविभागात कोरोना नियंत्रणात   :उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी

सुमारे 7 ते 8 महिन्यांपासून देशामध्ये आणि राज्यामध्ये  कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील अन्य विभागाप्रमाणे कोपरगांव व राहाता तालुक्यांचा समावेश असलेल्या शिर्डी उपविभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. तथापि, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, दोन्ही नगर परिषद आणि स्वयंसेवी संस्था यांनी अंमलबजावणी केलेल्या उपाययोजना आणि त्याला नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शिर्डी उपविभागात कोरोना नियंत्रणात आला असल्याचे  उपविभागीय अधिकारी श्री. गोविंद शिंदे यांनी सांगितले.


            राहाता तालुक्यात कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 हजार 563 आहे. आरोग्य यंत्रणेने आतापर्यत्‍ 15 हजार 601 स्वॅबचे नमुने घ्ज्ञेण्यात आले आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर जवळपास 17 टक्के असून 47 कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रुग्णांच्या मृत्युदराचे प्रमाण 1.83 टक्के एवढे आहे. 2 हजार 442 रुग्ण आतापर्यत बरे झाले आहेत. कोपरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 85 आहे. आरोग्य यंत्रणेने आतापर्यत 11 हजार 806 स्वॅबचे नमुने घेतले आहेत. रुग्ण पॉझिटिव्‍ह होण्याचा दर जवळपास 18 टक्के असून 37 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रुग्णांच्या मृत्युदराचे प्रमाण 1.77 टक्के आहे. 2 हजार 6 रुग्ण आतापर्यत बरे झाले असून 42 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


रुग्णसंख्या कमी होण्यास  ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसुत्रीचा उपयोग

         कोरोना नियंत्रणासाठी शासनाने जारी केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने नागरिकांना केले होते. या आवाहनाला नागरिकांनीसुध्दा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यामध्ये मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, लॉकडाऊन याबद्दल प्रबोधन करुन नागरिकांना त्याचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच आरोग्य यंत्रणेने कोविडव्यतिरिक्त इतर कारणाने आजारी असलेल्या रुग्णांवर तातडीने आणि वेळीच औषधोपचार केले. याबरोबरच कोविडबाधितांचे योग्यरितीने समुपदेशन केले. आजारी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळावा यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात आली. कोविडबाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसुत्रीचा वापर करुन ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करुन त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेचाही उपयोग रुग्णसंख्या कमी होण्यासाठी झाला. परिसरातील ग्रामिण रुग्णालये, शिर्डी येथील साई हॉस्पीटल, लोणी येथील प्रवरा मेडीकल हॉस्पीटल, कोपरगांव येथील कोठारी हॉस्पीटलचे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा शिर्डी संस्थान यांचे कोविड रुग्णांवरील उपचारासाठी  सहकार्य मिळाले. कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळावे यासाठी शासनाने जारी केलेल्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

         शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, संजय सातव, राहाता तहसिलदार कुंदन हिरे, कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे, राहाता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमादे म्हस्के, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, कोपरगांवचे गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे आव्हाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, पोलीस निरिक्षक अनिल कटके, राकेश मानगांवकर, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच समन्वयक सुशांत घोडके यांनी कोरोना नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले.     जाहिरात
Search
विडिओ
Recent News