जुने निकष बाजूला ठेऊन नविन निकषानुसार नुकसान भरपाई द्या:-संजय आंधळे


जुने निकष बाजूला ठेऊन नविन निकषानुसार नुकसान भरपाई द्या:-संजय आंधळे

जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन 

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

 अहमदनगर जिल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज शेवगाव तालुक्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी जनशक्ती विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईची मदत द्यावी अशा आशयाचे निवेदन दिले. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजयराव अंधाळे, बाळासाहेब फुंदे, अशोकराव पातकळ, गोरक्षनाथ खेडकर, सरपंच विजय साळवे, चंद्रकांत आंधळे, अजय नजन, चेअरमन बर्डे आदि उपस्थित होते.

 निवेदनात म्हंटले आहे की, चालू वर्षी सुरुवातीला पर्जन्यमान चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, बाजरी, मका, भुईमूग, तूर, ऊस तसेच फळबाग आदींची पेरणी तथा लागवड केली होती. परंतु गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके भुईसपाट झाले आहे. पावसाचा लहरीपणामुळे संकरित पिके कशीबशी काढणीला आली होती. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले असून मका, कापूस, तूर, सोयाबीन ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तसेच फळबागा यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. 

तसेच प्रचंड अतिवृष्टीने या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाता देखील येत नाही कारण शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतकरी हा दुहेरी संकटात सापडलेला आहे. मागील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शासनाकडून  काही ठिकाणचे पंचनामे झाले. परंतु शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही ही परिस्थिती संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शासनाने  सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित आर्थिक मदत द्यावी. पंचनामे करण्यासाठी देखील शेतामध्ये जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीने नुकसान भरपाईसाठी शासनाचे निकष खूप जुने व अत्यंत किचकट लावले आहेत. त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात खूप तोडगी शासकीय मदत शेतकऱ्यांना मिळते ते निकष बदलून या तालुक्यासाठी अतिवृष्टीचे नवीन निकष लावून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सौ.हर्षदाताई काकडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News