शेवगाव स्वाभिमानीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन


शेवगाव स्वाभिमानीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

गेल्या चार महिन्यापासून सतत होणाऱ्या पावसामुळे   त्यातल्या त्यात शेवगाव पाथर्डी या तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेले कापूस सोयाबीन बाजरी तूर ऊस फळबागा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे 

तरी हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर  जमा करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींनी  घ्यावी ही  विनंती यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे तालुका अध्यक्ष बाईजाबाई बटुळे शहराध्यक्ष हिराबाई घोडके ,संतोष गायकवाड ,दत्तात्रय फुंदे ,संदीप मोटकर दीपक बडे ,अशोक पावसे भीमराव बटुळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शेवगाव-पाथर्डी पाहणी दौऱ्याच्या वेळी देण्यात आले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News