शिरूर न्हावरा येथे तीन पत्ते क्लबवर पोलिसांचा छापा, 88000 हजाराच्या मुद्देमलासह तीनजण ताब्यात, DYSPराहुल धस यांच्या मारदर्शनाखाली दबंग कारवाई


शिरूर न्हावरा येथे तीन पत्ते  क्लबवर पोलिसांचा छापा, 88000 हजाराच्या मुद्देमलासह तीनजण ताब्यात, DYSPराहुल धस यांच्या मारदर्शनाखाली दबंग कारवाई

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :

शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या न्हावरा गावच्या हद्दीत गोठ्या सारख्या पत्र्याच्या खोलीत तीन पत्त्यांचा जुगार  चालू असल्याची माहिती मिळाली, त्यावेळी पेट्रोलिंग वर असलेल्या पो कॉन्स्टेबल धनंजय गाढवे,पो हवा ए एम केकान, पो नाईक के एस होले,पो ना डी बी वायकर,पो कॉन्स्टेबल अमोल गवळी हे दुपारी चार च्या दरम्यान पेट्रोलिंग करत असताना उपविभागीय पोलीस अधीक्षक 4राहुल धस याना या तीन पत्ते जुगार खेळ सुरू असल्याची पक्की खबर मिळाली,त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक काबुगडे याना आणि या पथकाला सदर ठिकाणी माहिती घेऊन छापा टाकण्याचे आदेश दिले त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे खुर्च्या आणि टेबलवर बसून 9 जण तो जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले, पोलिसांना पाहून सर्वजण पळून जात असताना त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,त्यांना त्यांची नावे विचारल्यावर त्यांनी पुढील प्रमाणे नावे सांगितले 1)शुभम राजेंद्र रणदिवे वय 19 राहणार न्हावरा बिडगर वस्ती शिरूर,2)गौतम लक्ष्मण इंगळे वय 32 रा इंगळे वस्ती करंजावणे शिरूर,3)सतिश सिताराम उगले वय 29 रा दहिवडी शिरूर या तिघांनी  इतर साथीदारांची नावे सांगितले ती पुढीलप्रमाणे 4)सुरेश गुलाबराव जाधव रा न्हावरा,5)गोरख जगताप,6)गोकुळ गव्हाणे दोघे रा न्हावरा दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही,7)अमोल गव्हाणे 8)बापू उर्फ संतोष बिडगर (पूर्ण नाव माहीत नाही),9)रमेश शांताराम चव्हाण तिघे राहणार रांजणगाव अशी सांगितले,त्या ठिकाणी पाहणी केली असता टेबलवर दोन पत्त्यांचे कॅट 19200 रु रोख 9 खुर्च्या,एक टेबल,तीन दुचाकी अशी असा एकूण 88200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे, अशी फिर्याद पो कॉन्स्टेबल धनंजय गाढवे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिली आहे,दौंड येथील मोठा दारू साठा उध्वस्त केल्यानंतर उपविभागीय पोलीस  अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर येथे ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News