अण्णा भाऊ साठे स्मारक चौकातील बॅरिकेटर्स त्वरित काढावे अँड.नितीन पोळ


अण्णा भाऊ साठे स्मारक चौकातील बॅरिकेटर्स त्वरित काढावे अँड.नितीन पोळ

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

नगरपालिकेने कोणतीही माहिती जाहीर न करता अण्णा भाऊ साठे स्मारक चौकात बॅरिकेटर्स उभे केले असून ते त्वरित हटवावेत अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की नगर पालिकेने जनतेस कोणतीच माहिती न देता अण्णा भाऊ साठे चौकात गोल  करून काही बॅरिकेटर्स लावले असून सदर बॅरिकेटर्स अनेक दिवसांपासून लावले आहे मात्र हे बॅरिकेटर्स का लावले या बाबत नगर पालिकेने अद्याप काहीच स्पष्टीकरण दिले नसले तर एका पतसंस्था ने या भागात सुशोभीकरण करण्याचे ठरवले आहे अशी दबक्या आवाजात चर्चा आहे मात्र यापूर्वी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली पाठीमागे घेतला होता त्याच प्रमाणे आता नवीन पूर्णाकृती पुतळा व स्मारक करण्यासाठी अनेक अडचणी आल्या असताना व जन भावनेचा  विचार न करता नगर पालिका प्रशासनाने या ठिकाणी बॅरिकेटर्स लावून नवीन सुशोभीकरणकरन करण्याचा घाट घातला आहे मात्र हे बॅरिकेटर्स त्वरित काढण्यात यावे व  स्वतःच्या प्रसिद्धी करिता सुशोभीकरण करण्या पेक्षा अण्णा भाऊ साठे चौक व स्मारकाच्या ठिकाणी या पतसंस्थेच्या सुशोभीकरण करावे अन्यथा या विरुद्ध अण्णा भाऊ प्रेमी नागरिक रस्त्यावर उतरतील असा पत्रकाद्वारे माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के, जिल्हाध्यक्ष  किरण अढांगळे , शहराध्यक्ष सुजल चंदनशिव, राजू रोकडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News