20 कोटी रुपये किमतीचे 20 किलो एम डी मफेड्रोन ड्रग जप्त,एका नायजेरियन नागरिकांसह चारजण अटक, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई


20 कोटी रुपये किमतीचे 20 किलो एम डी  मफेड्रोन ड्रग जप्त,एका नायजेरियन नागरिकांसह चारजण अटक, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली  मोठी कारवाई

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :

दिनांक 7 ऑक्टोबर 2020 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी चिंचवड चे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ व पथकाने चाकण पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सुमारे 20 किलो एमडी मेफेड्रोन हे 20 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर1089/20 कलम 8 क सह 21 क 22 क 29 , एन डी पी एस क्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व पाच आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली होती.

गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती पाहता पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा तपास पथकांची स्थापना केली त्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक चामले यांची पथके स्थापन करून तपास सुरू केला. या पथकांनी प्रथम किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे या आरोपींना अटक करून या गुन्ह्यातील एम डी ड्रग हे रांजणगाव येथे संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बनवले होते ते उघड केले त्या ठिकाणी ड्रग बनवण्याच्या मशिनरीसह कंपनी सील करण्यात आली आहे.

या गुन्ह्याच्या प्रमुख सूत्रधार असलेले तुषार सूर्यकांत काळे राहणार बोरवली व राकेश श्रीकांत खानिवडेकर उर्फ रॉकी रा वसई यांच्या शोधा करिता वरील 06 तपास पथकांनी कांदिवली, मुंबई, वसई, पालघर, नाशिक, नवी मुंबई व कर्जत या भागात तसेच मुंबई सहार विमानतळ याठिकाणी सतत 7 दिवस-रात्र मेहनत करून आरोपींचा शोध घेतला व त्यांना ताब्यात घेतले तसेच झुबी इफनेयी उडोको नावाचा नायजेरियन नागरिक याला ताब्यात घेतले. तो यापूर्वी अमली पदार्थांच्या केसमध्ये कोल्हापूर जेलमध्ये दहा वर्ष शिक्षा भोगलेला आरोपी आहे. त्याचा विजा पाहिला असता त्याने यामध्ये छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून त्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येत आहे.

  तुषार काळे व राकेश खनिवडेकर हे आरोपी बाहेर देशात पळून जाण्याची शक्यता असल्याने त्यांची लूक आऊट नोटीस जारी करून सर्व विमानतळांना वरील आरोपी बाबत सूचित करण्यात आले होते. आरोपी राकेश खांनिवडेकर उर्फ रॉकी याचा एनसीबी ची पथके सुद्धा शोध घेत होती त्यापूवीच त्याला पिंपरी चिंचवड च्या पोलिस तपास पथकांनी ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अक्षय काळे ,चेतन दंडवते, आनंदगिर गोसावी यांनी डिसेंबर 2019 मध्ये तुषार सूर्यकांत काळे, किरण राजगुरू, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद असलेल्या कंपनीमध्ये सुमारे 132 किलो एम डी ड्रग बनवले होते. त्यापैकी 112 किलो एम डी ड्रग हे तुषार काळे याने यापूर्वीच नेऊन त्याची बाजारात विक्री केली होती व उर्वरित राहिलेले 20 किलो ड्रग हे अक्षय काळे याने आपल्या घरी ठेवले होते. त्याची विक्री करीता घेऊन जात असताना चाकण शिक्रापूर रोडवर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागला होता.

रांजणगाव एमआयडीसीमधील एका दुसऱ्या कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करणारा किरण काळे यांनी याकामी अक्षय काळे, चेतन दंडवते व आनंद गिरी गोसावी, किरण राजगुरू व तुषार काळे यांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी एम डी ड्रग बनविणे साठी उपलब्ध करून दिली. त्यासाठी किरण काळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यालयात वरील सर्वांची मीटिंग घेऊन एमडी ड्रग बनवण्यासाठी 60 हजार रुपये प्रति किलो असा दर ठरवून दिला होता. तुषार काळे याने त्याबदल्यात एकूण 67 लाख रुपये त्यांना यापूर्वी दिलेले आहेत. सर्व आरोपीत यांचे बँक अकाऊंट फ्रिज केलेले आहेत तसेच त्यांनी सदरचे पैशांमधुन विकत घेतली आहे किंवा कसे याबाबत संबंधीत विभागाकडे पत्रव्यवहार करुन माहिती मागविलेली आहे. 

यापूर्वी च्या काळात छोटा राजन गँगशी संबंधित असलेला तुषार सूर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार कायद्याचे एकुण 08 गुन्हे त्याचेवर दाखल आहेत. त्याने रांजणगाव एम आई डी सी मध्ये संयोग बायोटेक मध्ये बनवलेला 132 किलो एमडी ड्रग पैकी 112 किलो ड्रग पुढे नायगाव वसई येथे राहणाऱ्या जुबी उकोडो नावाच्या नायजेरियन नागरिकाला विकला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तुषार काळे याला आरोपी राकेश खानिवडे कर यांने विक्री कामी, बनविणे कामी व त्यातील पैशाच्या विल्हेवाट लावण्यासाठी मदत केलेली आहे राकेश खानिवडेकर हा सुद्धा एमडी ड्रग चा रॅकेटमधील प्रमुख सूत्रधार असून यापूर्वी त्याला डी आर आय च्या अधिकाऱ्यांनी पालघर येथील एका कंपनीत अमली पदार्थ बनवण्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेली आहे.

तुषार काळे व राकेश खनिवडेकर यांच्याकडून अनुक्रमे 60 लाख रुपये व 25 लाख रुपये अशी एकूण 85 लाख रुपये ड्रग विक्री करून आलेल्या रकमपैकी काही रक्कम जप्त केलेली आहे. तसेच तुषार काळे याने मौजे पालसाई ता वाडा जिल्हा पालघर येथे 75 लाख रुपये किमतीची दोन एकर जागा विकत घेतल्याचे दस्तऐवज प्राप्त झाले असून सदरची शेत जमीन ही ड्रग विक्रीच्या पैशातून घेतली असल्याने ती मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे सदर जमिनीवर तुषार काळे स्वतः एक फॅक्टरी टाकनेची तयारी करत आसलेचे दिसून आले आहे. 

आरोपी तुषार काळे व राकेश खानीवडेकर यांनी आणखीन तीन ठिकाणी एम.डी. ड्रग बनविले असत्याचे तपासामध्ये निष्पन्न होत असुन त्यांचे इतर साथिदाराचा शोध घेण्याचे काम चालु आहे. 

गुन्ह्याचा तपास श्री बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट 5 पिंपरी चिंचवड हे करत असुन आजरोजीपर्यंत एकुण 20,90,23,100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन 75,00,000/- रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. 

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, गुन्हे शाखा युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले, पोलीस सब इन्स्पेक्टर चामले, काळुराम लांडगे व पोलीस कर्मचारी शाकिर जिनेडी, राजन महाडीक, राजेंद्र बांबळे, प्रदिप शेलार, शकुर तांबोळी, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, दिनकर भुजबळ, फारुक मुल्ला, गणेश मालुसरे, संतोष दिघे, संदिप पाटिल, संदिप ठाकरे, प्रसाद कलाटे, श्यामसुंदर गुट्टे, शैलेश मगर, नितीन बहिरट, प्रसाद जंगीलवाड, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, राजकुमार इघारे, अशोक गारगोटे, अजित कुटे, प्रविण कांबळे, दयानंद खेडकर, दादा धस, गोपाळ ब्रम्हांदे, धनंजय भोसले, भरत माने, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे व अनिता यादव यांचे तपास पथक यांनी अथक परिश्रम घेऊन सदर गुन्ह्याचा पुढील तपास यशस्वीपणे केलेला आहे. त्याबद्दल पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांनी कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पुरस्कार देऊन अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News