अनुसूचित जमातीच्या शंभर टक्के लाभार्थी यांना खावटी अनुदान वितरण करण्यात यावे गणेश गायकवाड


अनुसूचित जमातीच्या शंभर टक्के लाभार्थी यांना खावटी अनुदान वितरण करण्यात यावे गणेश गायकवाड

विठ्ठल  होले  पुणे प्रतिनिधी :

प्रत्येक ग्रामस्तरावरआदिवासींसाठी महाराष्ट्र शासनाने दि. 9 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार सध्या कोविड विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी 100% टक्के रोखीने खावटी कर्ज वाटप करण्याच्या निर्णयातून सूट देऊन हे योजना 100 टक्के अनुदानित योजना 1 वर्षासाठी (सन 20 20 व 21) करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ 50% टक्के रोख व 50 टक्के वस्तू स्वरुपात देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मा. प्रकल्पाधिकारी साहेब एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुणे व सर्व  तालुक्यातील तहसीलदार व गट विकास अधिकारी ग्रामस्तरावर ग्रामसेवक यांना माहिती  द्या व समिती स्थापन करून घ्या या योजनेच्या संकल्पनाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी काटे कोरपणे करून जिल्यातील  पात्र 100 टक्के अनुसूचित जमातीच्या बांधवांना ४०००/- रूपये प्रत्येक पात्र  कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळवून द्यावा 

तसेच माहिती स्वरूपात मा.तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती याकडून  योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी गावातील ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून घ्यायचा आहे कारण गेल्या बरेच वर्षापासून ही योजना बंद पडलेली होती आता  आपल्या योजनेचा शंभर टक्के लाभ आपल्या आदिवासी समाजाला होणार आहे तसेच   आदिवासी बांधवांनी याचा लाभ घ्यायचा आहे, असे आवाहन गणेश शहाजी गायकवाड आदिवासी विकास (असो.) संघटना युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News