काळे परिवार नेहमीच सामाजिक उपक्रमांच्या पाठीशी – सौ. चैतालीताई काळे


काळे परिवार नेहमीच सामाजिक उपक्रमांच्या पाठीशी – सौ. चैतालीताई काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 समाजातील दिन,दलित, शेतकरी,कष्टकरी कुटुंबातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच मदत करून अशा गरजू मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक उपक्रमांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. तीच परंपरा माजी आमदार अशोकदादा काळे यांनी जोपासली असून काळे परिवाराचा हा वारसा आमदार आशुतोष काळे पुढे चालवित आहे. सामाजिक उपक्रमांना साथ देणारा काळे परिवार यापुढे देखील अशा सामाजिक उपक्रमांच्या पाठीशी आमदार आशुतोषदादा काळे फाउंडेशनच्या माध्यमातून खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी दिली.

               सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाण व आमदार आशुतोषदादा काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण दवणे यांच्या जगण्याची कला या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या निधीतून कोपरगाव तालुक्यातील १० वीच्या निवडक गरजू विद्यार्थ्यांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाण व आमदार आशुतोषदादा काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलतांना जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे.

             त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या संकटामुळे सुरु करण्यात आलेला लॉक डाऊन संपला असला तरी शाळा महाविद्यालय बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक व प्राध्यापक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तास घेत आहेत. मात्र अनेक हुशार विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पालक स्मार्ट  फोन घेवू शकत नाहीत. अशा काही विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाण व आमदार आशुतोषदादा काळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या निधीतून स्मार्ट फोन देण्यात आले हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या स्मार्ट फोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सध्या येत असलेली अडचण दूर होणार असली तरी स्मार्ट फोनचा उपयोग हा केवळ अभ्यासासाठी करावा.शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नियमितपण शाळेत हजर राहून चांगला अभ्यास करून उत्तीर्ण व्हावे असा मौलिक सल्ला दिला.

           यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ठोळे उद्योगसमूहाचे कैलास ठोळे, सौ.स्मिता जोशी, ज्ञानेश्वर वाकचौरे, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ.संगिता मालकर, सौ.वृंदा कोऱ्हाळकर, सौ. वर्षा आगरकर, सौ. सुनीता वाकचौरे, सौ.सुनीता ससाणे, सौ. छाया गिरमे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News