शहापूर वि.का.से. सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे सूर्यभान पाचोरे !!


शहापूर वि.का.से. सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे सूर्यभान पाचोरे !!

शहापूर सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे सूर्यभान पाचोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना संचालक मंडळ.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील शहापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे सूर्यभान भिमाजी पाचोरे व व्हा.चेअरमनपदी माधव रंगनाथ सदाफळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शहापूर सोसायटीच्या विद्यमान चेअरमन सौ. शोभा घारे यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी चेअरमन पदासाठी सूर्यभान पाचोरे व व्हा.चेअरमनपदासाठी माधव सदाफळ यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची अनुक्रमे चेअरमन व व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी आर. एन. राहणे यांनी दिली आहे. यावेळी सोसायटीचे संचालक वसंतराव पाचोरे, रामनाथ पाचोरे, वाल्मिक घारे, साहेबराव डांगे, कोंडाजी खंडीझोड, नितीन पाचोरे, आप्पा घारे, दिगंबर गोसावी, भाऊसाहेब घारे, सौ. शोभा घारे, सचिव राजेंद्र गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.जाहिरात
Search
विडिओ
Recent News