विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचा सत्कार !!


विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचा सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

संधी ही सर्वांना मिळतेच असे नाही, परंतु स्वप्नील निखाडे यांना कमी वयात उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.युवकांचे संघटन आणि कोपरगाव शहरवासियांच्या हिताचे निर्णय घेउन मिळालेल्या संधीचे निश्चितच सोने करतील,असा विश्वास कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन, युवा नेते विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केला. 

उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीद्वारे आज पार पडली,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सहायक निवडणुक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. सकाळी 11 ते 1 या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्विकारण्याची मुदत होती. त्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वप्नील शिवाजी निखाडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. दुपारी 3 वाजता झालेल्या छानणीदरम्यान निखाडे यांचा अर्ज पिठासीन अधिकारी शिंदे यांनी वैध ठरविला. केवळ एकमेव अर्ज आल्याने निखाडे हे उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध 

विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. 

कोपरगाव औदयोगिक वसाहतीचे चेअरमन,युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी कोल्हे पुढे म्हणाले, नगरपालिकेच्या इतिहासात सर्वात कमी वयाचा उपनगराध्यक्ष होण्याचा मान निखाडे यांना मिळाला आहे. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भारतीय जनता पार्टीच्या सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताच्या कामाला प्राधान्य देउन विश्वास सार्थ ठरवतील असे कोल्हे म्हणाले. मावळते उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बागुल म्हणाले, माइया सारख्या सामान्य

कार्यकर्त्यांला कोल्हे परिवाराने उपनगराध्यक्षपदाची संधी दिली. त्यामुळे माइयातील समाजकारणाला निश्चितच चालना मिळाली, मने आणि विचार जुळले तर काहीही अशक्य नसते. गेली चार वर्षे सोबत राहिलो, आजही सोबत आहोत आणि यापुढील काळातही सोबत राहणार असल्याचे सांगून शिवसेनेच्या वतीने निखाडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी स्वप्नील निखाडे म्हणाले, माझ्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांला संधी दिली, माइयावर विश्वास टाकला याबददल कृतज्ञता व्यक्त केली. माझे पक्षश्रेप्ठी आणि पक्षाला अभिप्रेत असे काम करणार असुन जनहिताच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचे आभार मानले. शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी 

गटनेते रविंद्र पाठक, व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे, कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर, राजेंद्र शिंदे, संजय सातभाई, पराग संधान, बाळासाहेब नरोडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, जिल्हा सचिव कैलास खैरे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,  विजय आढाव दिपा गिरमे, विद्या सोनवणे, मंगल आढाव, सुवर्णा सोनवणे, ताराबाई जपे, विजय वाजे, जनार्दन कदम, अल्ताप कुरेशी, आरिफ कुरेशी, योगेश बागुल, पप्पू पडियार, वैभव गिरमे, शिवाजी खांडेकर, राजेंद्र सोनवणे, सत्यन मुंदडा, अनिल उर्फ कालुआप्पा आव्हाड, पिंकी चोपडा, रंजन जाधव, दिपक जपे, विवेक सोनवणे, ज्ञानेश्वर गोसावी, संजय पवार, कुणाल लोणारी, रवींद्र रोहमारे, शिवाजी निखाडे सर, शुभम काळे, साहेबराव रोहोम, सुभाष शिंदे, फारूक शेख, जालिंदर निखाडे, पोपटराव पवार, शरद शिंगाडे, सुभाष लोंढे, गोरख चव्हाण, विक्रांत सोनवणे, वासुदेव शिंदे आदीसह भाजपा शिवसेना नगरसेवक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News