फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवरात्रनिमित्त महिलांची मोफत नेत्र तपासणी


फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने  नवरात्रनिमित्त महिलांची मोफत नेत्र तपासणी

अवयवदानासाठी 18 महिलांचा संकल्प

महिला दुर्गेचे व शक्तीचे प्रतिक -जालिंदर बोरुडे 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -  फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवरात्रनिमित्त महिलांसाठी नागरदेवळे (ता. नगर) येथील लक्ष्मीनगरला मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीराला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. तर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या अहवानाला प्रतिसाद देत 18 महिलांनी अवयवदानाचा संकल्प केला.

या शिबीरात 178 महिलांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 34 शिबीरार्थींची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन शिबीर पार पडले. यावेळी  यमुना भोसले, आश्‍विनी कोळपकर, मंदा शेंडगे, मनिषा देवरुखकर आदि उपस्थित होत्या.

जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजाची जडण-घडण महिलांच्या संस्कारातून होत असते. महिलांनी अनेक क्षेत्रात प्रगती केली असून, दुर्गेचे व शक्तीचे प्रतिक म्हणून महिलांकडे पाहिले जाते. कोरोनाच्या संकटकाळात अनेक गरजू महिलांना शिबीराचा लाभ घेता यावा यासाठी नवरात्रनिमित्त खास महिलांसाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर अवयवदान काळाची गरज ओळखून महिलांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 34 शिबीरार्थीं महिलांवर लवकरच मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे सदस्य व नागरदेवळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News