चालु व पुढील वर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होणार !!बिपिनदादा कोल्हे


चालु व पुढील वर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होणार !!बिपिनदादा कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

चालू व पुढील वर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगासह शेतकरी बांधवाना वाचविण्यासाठी शाश्वत धोरण घेऊन साखर विक्रीचा दर ठरवून दिला.राज्यात यावर्षी एकशे पाच लाख टन साखरेचे उत्पादन होणार असल्याने केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने देखील या उद्योगाला वाचवण्यासाठी तातडीने मोठे पॅकेज द्यावे,व सततच्या पडणाऱ्या अवाकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेला खरीप पिकांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले असून याकरिता राज्यशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवाच्या खात्यात तातडीने मदत वर्ग करावी अशी मागणी संजीवनी  उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांनी केली. कोरोणा महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संजीवनी उद्योग समूह विजयादशमीच्या मुहूर्तावर अत्याधुनिक कोविड  सेंटरचे लोकार्पण करणार आहे असेही ते म्हणाले.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपण समारंभ बुधवारी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक अरुण येवले, सौ. कांताताई येवले यांच्या शुभहस्ते बुधवारी संपन्न झाला.  

याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी, वर्क्स मॅनेजर प्रकाश चांदगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्ताञय कोल्हे, भाजपाचे जेष्ठ नेते रवींद्र बोरावके, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे, भाजपचे जिल्हा उपा्ध्यक्ष शरद थोरात, विजय आढाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कैलास खैरे, कामगार नेते मनोहर शिंदे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे सर्व संचालक, सभासद कामगार विविध खातेप्रमुख,आदी उपस्थित होते.

श्री बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, मागील दोन वर्षे सहकारी साखर कारखानदारी उसाच्या कमी उपलब्धतेमुळे अडचणीत होती. मात्र चालू वर्षी पर्जन्यमान चांगले झाले शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रात 86032 उसाची चांगल्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत.   देशात यावर्षी तीनशे पाच लाख टन तर पुढील वर्षी 325 लाख टन  असे विक्रमी साखर उत्पादन होणार आहे.   साखर उत्पादन जादा होणार असल्याने साखरेचे दर घसरतील त्यासाठी साखर विक्रीचा दर 3700 रुपये प्रति क्विंटल निश्चित करून साखर उद्योगाला सहकार्य करावे.   

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी कारखाना सभासद व शेतकऱ्यांच्या सहकार्याने अनेक अडचणीवर  मात करुन मार्गक्रमण करत आहे. तत्कालीन पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी साखर उद्योगाला मदतीचा हात देण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली.   यंदा अतिरिक्त उसाचे उत्पादन होणार असल्याने 15 लाख टन इथेनॉल निर्मितीसाठी वळवला जाईल.   संजीवनी पुढचे सर्व तोटे भरून काढून नव्याने वेगळी झेप घेऊन साखर उद्योगात क्रांती करेल. ऊस गाळप व उतारा वाढवण्यासाठी आपण दोन वर्षापासून केलेल्या अभ्यासातून यांत्रिकीकरण करून आधुनिकता आणली आहे. बॉयलरचे अपग्रेडेशन केले आहे असेही ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

  शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू राज्यातील तीन पक्षाच्या शासनाला खरोखरच पूसायचे असेल तर खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी सत्ताधाऱ्यांनीच मागणी केलेले पंचवीस हजार रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकरी तसेच उद्योगाला वाचवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने मदतीसाठी पावले उचलावी असे बिपिनदादा कोल्हे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News