पाटस-खडकी,लिंगाळी-मलठण या जिल्हा परिषद गट व गणातील जि.प सदस्य,पं.स सदस्य ग्राम पंचायत ग्रामसेवक,प्रशासक यांची समन्वय सभा संपन्न गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी केले मार्गदर्शन


पाटस-खडकी,लिंगाळी-मलठण या जिल्हा परिषद गट व गणातील जि.प सदस्य,पं.स सदस्य ग्राम पंचायत ग्रामसेवक,प्रशासक यांची समन्वय सभा संपन्न गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी केले मार्गदर्शन

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :दौंड तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार करून सोडला आहे लोक अजूनही पावसाच्या दहशतीखाली जगत आहेत, अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे त्या संदर्भात आज गोपाळवाडी ग्रामपंचायत सभागृहात सभा संपन्न झाली,सभेचा उद्देश व मार्गदर्शन  दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आजिक्य येळे यांनी  केले.१४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाणी पुरवठा योजना,शेत रस्ते,ओढयावरील पूल इ.कामे प्राधान्याने करावीत अशी मागणी प.स सदस्य प्रकाश नवले,ताराबाई देवकाते,विकास कदम यांनी केली.जि प समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय व्यक्ती च्या घरामध्ये नळजोड देणे या योजनेमध्ये सर्व ग्रामसेवकांनी प्रस्ताव व माहिती त्वरीत देण्याच्या सुचना जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ.सारिकाताई पानसरे यांनी केली.व ग्रामसेवक प्रशासक यांनी समन्वयाने कामकाज करावे असे सांगीतले,१५ व्या वित्त आयोगाच्या कामासंदर्भात माहिती सह.गट विकास अधिकारी अजित देसाईसाहेब यांनी दिली.या वेळी १५ व्या वित्त आयोगाचा मंजुर आराखडा पत्रे पदधिकाऱ्याच्या हस्ते  ग्रामसेवकांना देण्यात आले.यावेळी ग्रामसेवक व प्रशासक उपस्थित होते.उपस्थित पदाधिकारी,अधिकारी यांचा सत्कार गोपाळवाडी ग्राम पंचायतच्या वतीने पं स सदस्य विकास कदम,ग्रामसेविका स्वातीताई लामकाने,ठकसेन सुळ यांनी केला,लिंगाळीचे ग्रामसेवक मच्छिद्रं निगडे भाऊसाहेबांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News