लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत गावठी पिस्टल व काडतुस सह एक आरोपी अटक : पुणे ग्रा. LCB शाखेची कामगिरी.


लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत  गावठी पिस्टल व काडतुस सह एक आरोपी अटक : पुणे ग्रा. LCB शाखेची कामगिरी.

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :पुणे शहर हडपसर पोलीस ठाण्यात घरफोडी,दरोड्याची तयारी,विनयभंग,किरकोळ दुखापत आसे 8 गुन्हे दाखल असलेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार  प्रतीक उर्फ नोन्या  वाघमारे वय 21 हा लोणी पोलिसांना हवा होता त्याला  आज रोजी पुणे ग्रामीण LCB टिमने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीनुसार लोणीकाळभोर पो.स्टे. हद्दीत मौजे लोणी स्टेशन चौक, मनोहर क्लॉथसमोर ता.हवेली जि.पुणे येथून आरोपी नामे *प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे वय २१ रा.शांतीसागर वसाहत , हडपसर पुणे* यास ताब्यात घेवून त्याचे कब्जातून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव बाळगलेले *१ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस* असा एकुण किं.रु. ५०,३०० / - चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. 

       *यातील आरोपी हा  रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी हडपसर पो.स्टे. पुणे शहर येथे दरोडा तयारी, घरफोडी, विनयभंग व दुखापत असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.*

       आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पो.स्टे. चे ताब्यात दिलेले आहे.सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,स.फौ. राजेंद्र थोरात,पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पो.ना. सुभाष राऊत,  पो.ना. गुरु गायकवाड, चा.पोहवा. प्रमोद नवले यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News