शासनाने शेतकरी,मजूर छोट्या व्यवसायिंकाना दिवाळी पँकेज द्यावे:- रवींद्र साबळे


शासनाने शेतकरी,मजूर छोट्या व्यवसायिंकाना दिवाळी पँकेज द्यावे:- रवींद्र साबळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 जगात कोरोनाच्या साथीने संपूर्ण जग व्यापून गेले आहे.अनेक देशात कोरोनाच्या संकटामुळे प्राणहाणी  झाली आहे.कोरोनाचे आजही ठोस उपाय नाही.या संकाटाला तोड देण्यासाठी जगात आणि आपल्या देशात टाळेबंदी जाहिर करण्यात आली या मुळे देशातील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग धंदे बंद होते.अनेकांना तर उपासमार करावी लागली.पाच ते सहा महिने या लाँकडाऊनमुळे अनेक व्यवसाय उद्योग धंदे ठप्प झाले.शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.लाँकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत असून उद्योग धंदे सुरू करण्यात येत आहे.असे असले तरी अाजही उद्योग धंदे,व्यवसाय चालवतांना आर्थिक अडचणी येत आहे.त्यातच दिवाळी सण आला अाहे.दिवाळी सण भारतात सर्वात मोठा सण असुन प्रत्येक कुटुंबाला अंदाजे पाच ते सहा हजार रुपये खर्च येतच असतो.परंतु कोरोनाच्या संकटामुळे आजही उद्योग धंदे व्यवसाय पाहिजे त्या प्रमाणात चालत नाही.त्यामुळे शासनाने दिवाळी पँकेज द्यावे.व शेतकरी बांधवाना दिवाळी पँकेज बनवावे.तसेच छोटे उद्योग धंदे असणार्या व्यवसायिंकाना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे.तसेच त्यांना दिवाळी पँकेज योजना चालु करावी.विविध खाजगी कंपन्यात अनेक मजूर काम करत असुन त्या मजुरांना डबल बोनस कंपन्यानी द्यावा असे शासनाने या कंपन्याना आदेश द्यावे.सफाई कामगार,चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांनाही विशेष योजना करुन राज्यातील गोरगरीब जनतेसाठी शासनाने दिवाळी पँकेज बनवावे.जेणेकरून दिवाळी सण साजरा करता येईल.असे क्राँग्रेसचे अनुसूचीत जाती सेलचे कोपरगाव शहराध्यक्ष रवींद्र साबळे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.पुढे ते म्हणाले की, लवकरच काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्याशी चर्चा करुन यासंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेवुन दिवाळी पँकेजसाठी प्रयत्न करु.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News