गोपाळवाडी गिरीम रस्त्यावरील ओढ्यावरचा पूल गेला वाहून, MIDC कामगारांची या रस्त्यावरून वर्दळ, अपघात होण्याची शक्यता


गोपाळवाडी गिरीम रस्त्यावरील ओढ्यावरचा पूल गेला वाहून, MIDC कामगारांची या रस्त्यावरून वर्दळ, अपघात होण्याची शक्यता

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी:

 गोपाळवाडी गिरीम गावच्या वेशीवर असणाऱ्या ओढ्यावरचा पूल वाहून गेला असून मोठे भगदाड पडले आहे,कुरकुंभ MIDC मध्ये जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जात आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, दौंड कुरकुंभ रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे दौंड परिसरातील कुरकुंभ MIDC मध्ये काम करणारे  कामगार, अधिकारी तसेच बारामती कडे जाण्यासाठी सुध्दा गोपाळवाडी गिरीम मार्गे जाणे पसंत करतात, त्यामुळे या रस्त्याने वर्दळ वाढली आहे, या पुलाचे काम त्या ठेकेदाराने अगोदरच चुकीचे केले आहे,जागेवर वळण केल्यामुळे यापूर्वी लोक सरळ जाऊन ओढ्यात पडले आहेत, मोठा अपघात झाला नाही त्यामुळे त्याची चर्चा कुठेही झाली नाही परंतू आता परतीच्या पावसाने ओढ्याला पूर येऊन पुलावरील डांबर वाहून जाऊन मोठा खड्डा पडला आहे, वळणावर ट्रक सारखी मोठी वाहने बसू शकत नाहीत, त्या पुलाचे स्ट्रक्चर चुकले असल्यामुळे तो पूल पडून नव्या पुलाची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News