दौंड पाटस रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग दौंड नगरपालिकेने शोधली कचऱ्यासाठी नवीन जागा


दौंड पाटस रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा ढीग दौंड नगरपालिकेने शोधली कचऱ्यासाठी नवीन जागा

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :

-- दौंड नगरपालिका कचऱ्याच्या बाबतीत उदासीन दिसत आहे शहर आणि परिसरात कचरा व्यवस्थापन होताना दिसत नाही, कचरा कुंड्या भरून कचरा बाजूला पसरत आहे,त्यावर मोकाट जनावरे आणि कुत्री भटकत आहेत आणि ते एकत्र येऊन जनतेला उपद्रव करीत आहेत,मागील महिन्यात एका गाईने डॉक्टरलाच उचलून फेकले त्यात त्यांचा हात फॅक्चर झाला मोठा अनर्थ थोडक्यात टळला,छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत, आता नगरपालिकेने कचरा साठवण्यासाठी नवीन जागा शोधली आहे,दौंड पाटस रस्त्याच्या कडेला चार पाच दिवसापासून कचरा टाकण्यास सुरवात केली आहे,या कचऱ्यामुळे दुचाकी चालवणाऱ्या ना त्रास होत आहे, वादळवाऱ्याचे दिवस असल्याने कचरा रस्त्यावर येत आहे,नगरपालिका प्रशासनाने कचरा प्रश्न लवकरात लवकर सोडवून जनतेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News