मंत्री, खासदार आमच्याकडे लक्ष जाईल का आम्ही सुध्दा माणसंच आहोत,ऊसतोडणी कामगारांची आर्त विनवणी


मंत्री, खासदार आमच्याकडे लक्ष जाईल का आम्ही सुध्दा माणसंच आहोत,ऊसतोडणी कामगारांची आर्त विनवणी

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी :

- दौंड तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे, त्याची पहाणी करायला आमदार खासदार,विरोधी पक्षनेते सुद्धा पाण्यातून फिरले,जिकडे हवा तिकडेच गवगवा अशीच परिस्थिती सध्या पहायला मिळत आहे,कोरोनाने आधीच हतबल झालेले आणि पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार गाव सोडून गिरीम गावच्या हद्दीत चाळीसगाव येथून 30 ते 40 कुटुंब आले आहेत, त्याच्या हाताला काम मिळाले नव्हते तोपर्यंतच परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या शेतात खोपी  उभा करेपर्यंत धुवून काढली लहान मुले जेष्ठांना घेऊन धावपळ उडाली, आजूबाजूला अंधार कुठे जावे कळेना,जाधववाडी येथील ग्रामस्थ मदतीला धावून आले त्यांनी जिल्हा परिषद शाळेत त्यांना आसरा दिला परंतू पोटाचे काय, आमच्या प्रतिनिधींशी बोलताना मुकादम प्रकाश शिंदे यांनी विनंती केली आहे की आम्ही पण माणसंच आहोत अमच्याकडे कोणी लक्ष देईल का आम्ही अगोदरच उघड्यावर रहातो आणि या पावसाने अजून त्यात भर घातली आणि होते नव्हते ते सुध्दा पाण्यात गेले आज आम्ही रस्त्याच्या कडेला जीव मुठीत घेऊन रहात आहोत,आम्हाला कळले मोठमोठे लोक येऊन पाहून गेले आहेत, आमच्याकडे ही पहा आमच्या हालअपेष्टा समजून घ्या अशी आर्त विनवणी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News