अकोले येथे विना परवाना गावठी पिस्तूल व काडतुस बाळगणाऱ्या दोघांना अटक - जीवन माने


अकोले येथे विना परवाना गावठी पिस्तूल व काडतुस बाळगणाऱ्या दोघांना अटक - जीवन माने

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

अकोले ता.इंदापूर येथून विना परवाना गावठी पिस्तुल व काडतुस जप्त करुन दोघांना अटक करण्यात आल्याची माहीती भिगवण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

     भिगवण पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार  पो.स्टे. हद्दीत मौजे अकोले ता.इंदापूर  जि.पुणे गावचे हद्दीतील गणपती मंदिरासमोरील रोडवर आरोपी  दादासो रामचंद्र दराडे याचे ताबेतील मारुती सुझुकी एस क्रॉस MH 42 AS 0008 हिचे मधून एक अग्नीशस्त्र( गावठी पिस्टल),  4 जिवंत काडतुस जवळ बाळगून फिरत असताना त्यास  ताब्यात घेऊन त्याच्या कबज्यातून बेकायदा बिगर परवाना व बेकायदेशीर हेतुस्तव बाळगलेले अग्निशस्त्र व काडतुस असा एकुण किं.रु. ५,५०,८०० / - चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर गुन्ह्यातील दुसरा आरोपी  महादेव चंद्रकांत दराडे  यासही शिताफीने अटक करण्यात आलेली आहे 

       सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली पो हवा. नाना वीर,  पो ना.गोरख पवार,पो ना.इन्कलाब पठाण यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News