शिर्डी, राजेंद्र दूनबळे
श्रीमंत देवस्थानात दोन नबर तीर्थ क्षेत्र म्हणून नावाजलेले श्री साईबाबा संस्थान शिर्डी हे आहे परंतु आज याच संस्थान मधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे ,तुटपुंज्या पगारात आपल्या संसाराचा भार उचलीत आहे ,या पुढे कुटूंबाचे भविष्य काय,, श्री साईबाबा संस्थान च्या कंत्राटी कामगारांना कोणी वाली आहे का ? श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच जपावा का ? आजवर कधीही लिहावं असं वाटलं नाही पण आज मात्र रहावेना .त्याला कारणही तसंच काहीसं झालं, आणि हो, हि पोस्ट फक्त लाइक आणि शेअर साठी मुळीच नाही. काल योगायोगाने एक जीवलग कर्मचारी मित्र भेटल्याने रस्त्यावरच बोलत उभे राहिलो ,मस्करितच म्हटले उगाच चहा प्यायला नेसील घरी .तर लगेच त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणला, मी कधी नाही म्हटले पण आज परिस्थिती नाही गड्या. डोळे भरून आलेले पाहून मी म्हटलं झालं तरी काय, तर म्हणला भाऊ माझ्या घरात महिना झाला चहाच बनला नाही हो, बायकोनं समजून घेतलं पण मुलांना समजून सांगतांना रोजच रडू यायचे. मुलांना रोज खोट बोलायचो कि डॉक्टरांनी काही दिवस चहा प्यायला नाही सांगीतला आता रडायची वेळ माझी होती ,कळेना मित्राच्या बोलण्यावर रडावे कि हसावे. तो म्हणाला घर मालकाने भाडं मागणी सुरू केली ६००० रुपये येतात ३००० रुपये घर भाड आणि लाईट बीलाचेच जाताय आईचे औषध काही आपल्या हॉस्पिटलला मळतात तरी महिन्याला १८०० रुपये बाहेर च्या औषधला लागतात तुम्ही सांगा काय करायचं आपण जगायचं कस , मी म्हटलं चल गावात आपण चहा घेउ तर म्हणला भाऊ चहाची सवयच नाही राहिली आता आणि प्यावासा वाटत पण नाही, पण दादा लेकरांना समजावताना लयी त्रास होतो, मी पोरांना महिनाभरात बाहेर येऊ दिलं नाही भाऊ मलाच भीती वाटते की कधी काय मागतील पोरं आणि त्यांना काय देऊ शेवटी अनेक शिव्या शाप देऊन म्हणला भाऊ आपली परीस्थिती कधी बदलणार बाबालाचं माहीत आशी काय चूक झाली ज्यामुळे कंत्राटी कामगारांना असे दिवस बघायला मिळत आहे परवा एका मित्राने पण खूपच परखड मत व्यक्त करत एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली तेव्हा वाटल नव्हते कि आपण पण काहितरीलिहावं पण आज मित्राच्या डोळ्यातले अश्रू स्वस्थ बसू देइना एक तर पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला, 15 ते 20 वर्ष काम करूनही कोणी आमचा प्रश्न सोडीत नाही , पगार देखील,तो वेळेवर मिळत नाही , आम्ही आसा काय गुन्हा केला ज्याची किंमत जवळपास दोन हजार कुटुंबातील सदस्यांना मोजावी लागत आहे आमचे इतर कायम कर्मचारी मित्र सणासुदीला आमच्या शेजारी गोड धोड बनवून खानार त्या दिवशी आम्ही आमच्या लेकरांना आई वडील यांना काय उत्तर द्यावे लागणार याची कल्पना सुद्धा करवत नाही आमच्या मायबापहो बघा काही मार्ग निघतो का नाही तर एवढ्या कुटुंबातील लोकांनी दिलेला तळतळाट खूप काही सांगून ,जाईल बाबांनी श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला हे सगळे जण जाणतात पण जर कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असेल तर काय करणार , साईबाबा आता तूच आमचा वाली आहे असे म्हणून रोज ,आज ना उद्या आपला प्रश्न सुटेल या आशेवर जगल्या खेरीज पर्याय नाही