निंबळकला घरकुल वंचितांसाठी 231 प्लॉट उपलब्ध!! प्रकल्पाच्या कामाचे भूमिपुजन बा.बापू यांच्या पादुका पूजनाने होणार


निंबळकला घरकुल वंचितांसाठी 231 प्लॉट उपलब्ध!! प्रकल्पाच्या कामाचे भूमिपुजन बा.बापू यांच्या पादुका पूजनाने होणार

सरकार विसंबून राहून निवारा व रोजीरोटीचा प्रश्‍न सुटणार नाही -अ‍ॅड. गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने हाऊसिंग सोसायटीची निर्मिती करुन इसळक, निंबळक येथे खडकाळ पड जमीनीवर उभे राहत असलेल्या घरकुल प्रकल्पाच्या कामाचे भूमिपुजन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते बा.बापू यांच्या पादुका पूजनाने होणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

निंबळक येथील सर्व्हे नं. 54 या खडकाळ पड जमीनीवर 231 प्लॉट पाडण्यात आले आहे. सदर 1 गुंठ्याचे प्लॉट  हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना बाजारभावाच्या अल्प किंमतीत उपलब्ध होणार आहे. 80 हजार ते 1 लाख रुपया पर्यंत सदर जागा मिळणार आहे. कॉलनी असतित्वात आल्यास वीज व रस्त्याचा प्रश्‍न देखील मार्गी लावण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार आहे. शहरातील झोपडपट्टी कमी होऊन घरकुल वंचितांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असलयाचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. देशात भौतिक प्रगती करण्यापेक्षा अध्यात्मावर अधिक भर देण्यात आला. यामुळे नागरिक कर्मकांडात अधिक गुंतल्याने विकासापासून वंचित राहिले. मानसशास्त्र व व्यवस्थापन शास्त्रात भक्ती, ज्ञान व कर्म या गोष्टींना मानवी जीवनात अत्यंत महत्त्व आहे. मात्र याचा उपयोग कर्मकांडासाठी करण्यात आला. भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजी अब्दुल कलाम यांनी या त्रिसूत्रीचा वापर करुन मोठे ध्येय गाठले. आत्मनिर्भर रोजी व निवारा भज्ञाक या दोन गोष्टींचा ध्यास घेतल्यास घरकुल वंचितांच्या जीवनात बदल घडणार आहे. सरकार विसंबून राहून निवारा व रोजीरोटीचा प्रश्‍न सुटणार नाही. राजकारणी व्यक्ती मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्‍वासने देतात. तर निवडून आल्यानंतर आश्‍वासने विसरुन जातात. स्वत:चे प्रश्‍न स्वत: सोडविण्यासाठी प्रत्येकाला कटिबध्द राहून संघर्ष करावा लागणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले आहे. घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी अ‍ॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे आदि प्रयत्नशील आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News