श्रीगोंदा शहराचे भूमिपुत्र पो.उ.नि- प्रेमकुमार दांडेकर यांचे पो.अ.अंकित गोयल यांच्या कडून कौतुक व शुभेच्छा......


श्रीगोंदा शहराचे भूमिपुत्र पो.उ.नि- प्रेमकुमार दांडेकर यांचे पो.अ.अंकित गोयल यांच्या कडून कौतुक व शुभेच्छा......

श्रीगोंदा/प्रतिनिधि, अंकुशतुपे

श्रीगोंदा शहरा मधील गणपति मळयाचे भूमिपुत्र पोलीस उप निरीक्षक- प्रेमकुमार दांडेकर यांनी दिनांक१८-१०-२०२०रोजी उपविभाग धानोरा अंतर्गत पोमके ग्यारापती हड्डितील मौजा- किसनेली (गडचिरोली)जंगल परिसरात नक्षल वादी दबुन असल्याची गोपनीय माहितीदारा मार्फत कलताच दांडेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ऐक पथक प्रभारी म्हणून तयार केले. त्या पथकातील जवानांना योग्य मार्गदर्शन करून तत्काळ पथकासह रवाना झाले.

        सविस्तर असे की दरम्यान किसनेली जंगल परिसरात अभियान राबवित असतांना दबा धरून बसलेल्या नक्षत्रलवाध्यां कडून पोलीस पथकावर अंदा-धंद  गोळीबारी केला असता त्यांना दांडेकर यांनी प्रत्यूतर समय सूचकता व बुद्धि कौशल्याचा करून स्वताच्या जीवाची पर्वा न करता, जोरदार गोळीबार करून पोलीस पथकावर भ्याड हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव दांडेकर यांनी उधळून लावला व कोणतेही अप्रिय घटनेशिवाय पाच जहाल नक्षल वाद्यांना कंठस्नान घातले व मोठ्या प्रमाणात नक्षली सहित्य हस्तगत करण्यात पथकाला यश मिळून देणे ही निश्चितच प्रशंसनीय व कौतुकास्पद बाब असून पोलीस दलाची प्रतिमा उंचावनारी आहे.

     त्यामुळे प्रेमकुमार दांडेकर यांच्या उत्कृष्ट व धाडशी कामगिरीला गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.

      तसेच दांडेकर यांना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार,मा.जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भोस,राजेंद्र आबा मस्के,मा.नगरध्यक्ष मनोहर पोटे,नगरपालीकेचे उप.अध्यक्ष रमेश लाढाणे,पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे,चंदन घोडके, प्रहारचे नितीन रोही, सुदाम दांडेकर, नगरसेवक अंबादास औटी,संतोष खेतमाळीस आदिनीं शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेमकुमार दांडेकर यांच्या कडून गडचिरोली पोलीस अधीक्षक गोयल यांनी भविष्यात सुध्दा अशीच यशवी कामगिरी कराल ही अपेक्षा ठेवली आहे. तसे पत्र दांडेकर यांना दिले आहे.जाहिरात
Search
विडिओ
Recent News