श्रीगोंदा तालुका काँग्रेसची आढावा बैठक पार: कृषी कायदा रद्द करण्यासाठी सह्यांची मोहीम.


श्रीगोंदा तालुका काँग्रेसची आढावा बैठक पार: कृषी कायदा रद्द करण्यासाठी सह्यांची मोहीम.

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.१९: अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस व श्रीगोंदा तालुका एनएसयूआयची संघटनात्मक आढावा बैठक सोमवारी सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे पार पडली. बैठकीत केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरुद्ध व नुकताच केलेला कृषी कायदा रद्द करावा म्हणून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

          श्रीगोंदा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दीपक भोसले यांच्या अध्यक्षते खाली बैठक पार पडली. यावेळी  जिल्हा परिषद सदस्या अनुराधाताई नागवडे, जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणजी काळे, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआय जिल्हाअध्यक्ष निखीलजी पापडेजा, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे , कर्जत, पारनेर, नगर तालुका युवक  काँग्रेस समन्वयक स्मितलभैय्या वाबळे , नगरसेवक प्रशांत गोरे,संतोष कोथिंबीरे, राजाभाऊ लोखंडे,समीर बोरा, निसार बेपारी, जिल्हा सरचिटणीस बाळाआप्पा पाचपुते,जिल्हा काँग्रेस सहसचिव ज्ञानदेव गवते, संचालक योगेश भोईटे ,सुरेखा लकडे, विजय कापसे , सुनील माने, बाजार समितीचे उपसभापती संजय महांडुळे, राहुल उगले, आदिल शेख, आदेश शेंडगे,धीरज खेतमाळीस,विनोद कुताळ व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतआढावा बैठक संपन्न झाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News