परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या मागास पिकांची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू – आमदार आशुतोष काळे


परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या मागास पिकांची नुकसानभरपाई  मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू – आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

मागील दोन दिवसात परतीच्या पावसाने मागास सोयाबीन, बाजरी, मका व कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघात रविवार (दि.१८) रोजी दुपारी व मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने काढणीला आलेल्या मागास सोयाबीन,बाजरी,मका तसेच कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

          यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे. जाणता राजा अशी ओळख असलेल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकारने आजवर शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे त्यामुळे मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कोट्यावधींची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वेळोवेळी जमा करण्यात आली आहे. चालूवर्षी पावसाचे प्रमाण प्रचंड असून या पावसाने सर्व विक्रम मोडले आहे. वैश्विक कोरोना संकट,काही महिन्यापूर्वी आलेले चक्रीवादळ अशा संकटांचा महाविकास आघाडी सरकारने यशस्वी मुकाबला केला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला माल घरात येण्यापुर्वीच निसर्गनिर्मित संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे.मागील दोन दिवसांपूर्वी येवू घातलेल्या चक्रीवादळातून आपला जिल्हा थोडक्यात बचावला त्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी नुकसान झालेच असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे शासनदरबारी प्रयत्न  करू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

          याप्रसंगी सभापती सौ.पोर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक हरिभाऊ शिंदे, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, विष्णू शिंदे, नितीन शिंदे,अनिल दवंगे, सुनील गिरमे प्रदीप बंब, ज्ञानदेव दवंगे, सुनील दवंगे, सुहास दवंगे, काकासाहेब शिंदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदी उपस्थित होते.

             रविवारी अतिवृष्टीमुळे  झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी करतांना आमदार आशुतोष काळे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News